Accident Video Viral Saam TV
देश विदेश

Bus Accident Video Viral: बसचा विचित्र अपघात CCTVमध्ये कैद; स्पीड ब्रेकर ओलांडताच घडलं असं काही की सगळ्यांनाच धक्का बसला

Accident Video Viral: बस अपघाताचा हा व्हिडीओ गुजरातच्या जामनगरमधील आहे.

साम टिव्ही ब्युरो

Accident Viral Video: अपघातांचे अनेक व्हिडीओ  (Viral Video)  सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताच व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र बस अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गुजरातच्या जामनगरमधील अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला. या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडीओतील दृष्यानुसार, एक बस रस्त्याने जात आहे. स्पीड ब्रेकर ओलांडताना अचानक बसची मागची काच फुटते आणि काहीजण बसच्या खाली पडतात. बस चालकाने वेगाने बस स्पीड ब्रेकरवरुन नेली त्यामुळे जोरदार धक्का बसची मागची काच फुटली. काच फुटल्याने मागे उभे असलेले दोन विद्यार्थी बसमधून थेट खाली कोसळले. (Viral News)

सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर बस डेपोच्या व्यवस्थापकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत बस चालकाला निलंबित केले. त्याचवेळी बसच्या काचा फुटल्याने दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT