New Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Fake Currency Racket: अशोक खरातनंतर आणखी एका बाबाचा कारनामा उघड; आश्रमातच सुरू होताना नको 'तो' प्रकार

Fake Currency Racket in Ashram : गुजरातमध्ये ₹२ कोटींहून अधिकच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. एका बाबाच्या आश्रमावर पोलिसांनी छापा टाकत बनावट नोटांचा कारखाना उद्धवस्त केला आहे.

Bharat Jadhav

  • गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

  • पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त

  • अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरातचं लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अजून एका बाबाचा कारनामा समोर आला आहे. या बाबाच्या आश्रमात गैरप्रकार चालू होता. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हा बाबा गुजरातमधील असून अहमदाबाद गुन्हे शाखेने त्याचा कारनामा समोर आणला आहे. या बाबाने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून २कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या आहेत.

सुरत जवळील कामरेज तालुक्यातील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात गैर प्रकार सुरू होता. बाहेर धर्माचे पांघरूण घेऊ आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. या बनावट नोट छापखान्याची माहिती गुन्हे शाखेला एक गुप्त प्रकरे मिळाली होती. त्यानुसार सुरत येथून नकली नोटांची एक मोठी खेप अहमदाबाद येथे आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली होती. तिथे काही महिला आणि ६ पुरुषांच्या संशयास्पद हालचाल दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४० हजारांहून अधिक नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. या आरोपींची चौकशी केल्यानंतर सुरत येथील वराछा या परिसरात या नोटा छापण्यात आल्याचे समोर आले.

या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी ५०० रुपयांची नोट द्या आणि १५०० रुपयांच्या नकली नोटा मिळवा,अशी स्कीम होती. या भामट्यांनी ६६ लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा भांडाफोड केला.

पोलिसांनी संबंधित आश्रमात छापा टाकत तेथून प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आदी साहित्य जप्त केले. यासह पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. आश्रमातील वाहनांचा वापरही या नकली नोटांच्या रॅकेटसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT