Vadodara Crime news Saam TV News
देश विदेश

लज्जास्पद! नवऱ्याचं स्पर्म काउंट कमी, बायको प्रेग्नेंट राहत नव्हती; सासरा अन् दिराकडून महिलेवर बलात्कार

Infertility leads to shocking crime: नवऱ्याचे स्पर्म काऊंट कमी असल्याने गर्भधारणेवर दबाव. सासरा अन् दिराकडून जबरदस्ती शारीरिक संबंध. नवापुरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंद, तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • वडोदरा येथील ४० वर्षीय महिलेचा सासरा आणि दिरावर बलात्काराचा आरोप.

  • नवऱ्याचे स्पर्म काऊंट कमी असल्याने गर्भधारणेवर दबाव, जबरदस्ती शारीरिक संबंध.

  • पतीकडून धमक्या, ऑगस्टमध्ये गर्भपात, IVF प्रयत्नही निष्फळ.

  • नवापुरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंद, तपास सुरू.

वडोदरा येथील एका ४० वर्षीय महिलेनं तिच्या सासऱ्यावर आणि दिरावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं की, नवऱ्याचे स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे मूल होत नव्हतं. यामुळे सासरा आणि दिरानं जबरजस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. जेणेकरून पीडित महिला गर्भवती राहायला हवी. या प्रकरणी पीडितेनं पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, एफआयआर नोंदवला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित महिलेनं नवापुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच तिनं पतीवरही गंभीर आरोप केले आहेत. पतीनं या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं की, फेब्रुवारी २०२४ साली लग्न झाले. ती सासरी आली. सासरच्या मंडळींनी महिलेचं वय अधिक असल्यामुळे गर्भधारणेमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तसेच त्यांना फर्टिलिटी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. टेस्ट केल्यानंतर नवऱ्यामध्ये स्पर्म काऊंट कमी असल्याचं आढळलं. ज्यामुळे नैसर्गिकरित्या महिला गर्भवती राहू शकत नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महिलेनं आयव्हिएफ केलं. परंतु तरीही यशस्वी झाले नाही. तिनं तिच्या पतीला पुढील उपचार न घेण्याचा आणि मूल दत्तक घेण्याचा सल्ल दिला. परंतु सासरच्या मंडळींना ही बाब खटकली. जुलै २०२४ साली महिलेच्या खोलीत सासरे आले आणि पीडित महिलेवर जबरदस्ती केली. बलात्कार करत असताना तिनं विरोध केला. त्यावेळेस तिला मारहाण केली.

पीडित महिलेनं घडलेली घटना पतीला सांगितली. तेव्हा पतीनं महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. डिसेंबर महिन्यात दिरानं देखील महिलेसोबत अत्याचार केला. यादरम्यान, महिला गर्भवती राहिली. पण ऑगस्ट महिन्यात तिचा गर्भपात झाला. नंतर तिनं पोलिसांकडे धाव घेत आपबिती सांगितली. रविवारी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT