Supreme Court SAAM TV
देश विदेश

Supreme Court: बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; गुजरात हायकोर्टाला सुनावले

Supreme Court: २५ वर्षीय पीडित मुलगी २८ आठवड्यांची गरोदर असून गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली आहे.

Vishal Gangurde

New Delhi: गुजरातमधील बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. २५ वर्षीय पीडित मुलगी २८ आठवड्यांची गरोदर असून गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पीडितेला गर्भपाताची परवानगी दिली आहे. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने गुजरात हायकोर्टालाही सुनावलं. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या विशेष खंडपीठाने तातडीने सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान, यमूर्ती बी. व्ही नागरत्न यांनी पीडितेला परवानगी दिली.

गुजरात हायकोर्टाने फेटाळली होती पीडितेची याचिका

गुजरात हायकोर्टाने पीडित महिलेची १७ ऑगस्ट रोजी गर्भपात पीडितेची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पीडितेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने गुजरात हायकोर्टाला सुनावणी तातडीने न केल्याने सुनावले.

काय आहे प्रकरण?

पीडितेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, ७ ऑगस्ट रोजी गुजरात उच्च न्यायालयात गर्भपाताबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान गरोदरपणाची स्थिती तपासण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन निर्देश देण्यात आले होते.

यानंतर या बोर्डाचा अहवाल १० ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला. पुढे . 11 ऑगस्ट रोजी न्यायालयाने अहवाल रेकॉर्डवर घेतला. त्यानंतर हे प्रकरण 23 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलं.

गर्भधारणा गर्भपाताचा नियम काय सांगतो?

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यांतर्गत विवाहित महिला, अत्याचार पीडित, अपंग महिला आणि अल्पवयीन मुलीला २४ आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: जळगाव कुंभारीला उभारणार पोलिस प्रशिक्षण केंद्र - मंत्री उइके यांची घोषणा

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT