Gujarat Vadodara Children Drowned Saam Tv
देश विदेश

Vadodara News: गुजरात दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! 12 विद्यार्थी, 2 शिक्षकांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Gujarat Vadodara Children Drowned: गुजरातमधील वडोदरा येथे मुलांनी भरलेली बोट उलटल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Satish Kengar

Gujarat Vadodara Children Drowned:

गुजरातमधील वडोदरा येथे मुलांनी भरलेली बोट उलटल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. शाळकरी मुले हरणी येथील व्होटनाथ तलावात बोटिंगसाठी गेली होती.

दरम्यान, या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींनी नुकसान भरपाई केली जाहीर

वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. या दु:खाच्या प्रसंगी माझी संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे, असं ते ट्वीट करून म्हणाले आहेत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असंही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत 27 हून अधिक मुले आणि शिक्षक होते. पोलीस आणि सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या अग्निशमन विभागाचे जवान बचावकार्य करत आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

मृतांचा आकडा वाढू शकतो, असं बोललं जात आहे. शाळेतील सर्व मुले न्यू सनराईज स्कूलमधी असल्याचे सांगण्यात आले आहे. या बोटीत केवळ 16 मुलांना बसण्याची क्षमता होती. मात्र 27 मुले निष्काळजीपणे बसल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडली. याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुलांना लाइफ जॅकेटशिवाय बोटीत बसवलं

वडोदराचे जिल्हाधिकारी ए बी गोरे आणि पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत हेही घटनास्थळी उपस्थित आहेत. प्राथमिक तपासात वडोदरा महानगरपालिकेने या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. बोटिंगसाठी गेलेल्या मुलांना करताना शाळकरी मुलांना लाइफ जॅकेटशिवाय बोटीत बसवण्यात आलं, असे सांगितले जाते. ज्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT