Vadodara car accident Rakshit Chaurasia Saam Tv News
देश विदेश

Accident News : मी प्यायलो नव्हतो, ५०च्या स्पीडने जात होतो; पण तेवढ्यात..., महिलेल्या उडवणाऱ्या तरुणाचा दावा, अनदर राऊण्ड का म्हणाला?

Vadodara Car Accident : आरोपीने शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आमची कार दुचाकीच्या पुढे जाऊन उजवीकडे वळणार होती. इतक्यात रस्त्यावर एक खड्डा आला.

Prashant Patil

गांधीनगर : गुजरातच्या वडोदरा शहरात मध्यरात्री एका बेफाम गाडी चालकानं पाच जणांना चिरडल्याची घटना घडली असून, यात एक महिला ठार झाली. वडोदरा शहरात कायदाचं शिक्षण करत असलेल्या २० वर्षीय तरुणाने भरधाव गाडी चालवत दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री, साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. हा तरुण दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं त्याला पकडणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं, मात्र घटनेवेळी आपण मद्यप्राशन केलं नव्हतं, असा दावा त्याने केला आहे. यावेळी तो 'अनदर राऊण्ड... अनदर राऊण्ड.. निकिता मेरी' असं बडबडही करत होता.

रक्षित चौरसिया असं या विद्यार्थ्याचं नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. येथे ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त पन्ना मोमाया यांनी दिली. हेमाली पटेल या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला. त्या दुचाकी चालवत असताना चौरसियाने त्यांनी धडक दिली.

आरोपीने शनिवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आमची कार दुचाकीच्या पुढे जाऊन उजवीकडे वळणार होती. इतक्यात रस्त्यावर एक खड्डा आला. यामुळे कारचा दुचाकीला स्पर्श झाला, ज्यामुळे एअरबॅग्ज उघडल्या आणि मला पुढचं काहीच दिसलं नाही. त्यामुळे कार अनियंत्रित झाली, असा दावा रक्षित चौरसियानं केला आहे.

मी दारु प्यायलो नव्हतो. ताशी ५० किमीच्या स्पीडने कार चालवत होतो. मी कुठलीही पार्टी केली नाही. आम्ही होळी दहनाला गेलो होतो, असा दावाही रक्षितनं केला. त्याने मयत महिलेच्या कुटुंबाला भेटण्याची विनंती केली. तसंच या अपघाताला आपण जबाबदार असल्याचंही म्हटलं. त्यांची जी इच्छा असेल, ते मान्य करण्याची तयारीही रक्षितनं दर्शवली.

रक्षित चौरसिया चालवत असलेली गाडी त्याचा मित्र मित चौहान याच्या मालकीची होती. अपघातावेळी तोसुद्धा गाडीत होता. मात्र, नंतर तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने पळताना रक्षितवरच आरोप केला आणि तो फरार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT