Foodie Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: विक्रेत्याचा नवा प्रयोग! ऑम्लेटमध्ये असं काही मिसळलं होतं, ते पाहून लोक चक्रावले; पाहा VIDEO

Foodie Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. त्यात पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संतापलेले आहेत. नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहाच.
Published on

Chilli Oreo Omelette Video: स्ट्रीट फूड म्हणजे हटके आणि भन्नाट पदार्थांची मेजवानी, पण अनेकदा काही स्ट्रीट पाहून बरेचजण हैराणही होतात. असाच एक विचित्र खाद्य प्रयोग सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरलाय. कोलकत्त्यातील एका खाद्य विक्रेत्याने चक्क ऑम्लेटमध्ये ओरिओ बिस्किट घालून चिली ओरिओ ऑम्लेट तयार केले. व्हिडिओ पाहता पाहता हा पदार्थही व्हायरलही झालेला आहे.

चिली ओरिओ ऑम्लेट नेमकं काय आहे?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहु शकता, एका रस्त्याच्या बाजूला एक खाद्य विक्रेत्याची हातगाडी आहे. त्याच हातगाडीवर तो विक्रेता पहिल्या एका तव्यावर अंडी फोडून त्यात मिरची आणि काही मसाले टाकतो. हे सर्व पाहून सुरुवातीस सामान्य वाटते, पण नंतर तो विक्रेता चक्क त्या ऑम्लेटमध्ये ओरीओ बिस्कट मिसळतो. ऑम्लेटसह ओरिओचं मिश्रण पाहून पाहणारा प्रत्येकजण चक्रावून गेलेला आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रियाही देऊ लागला आहे.

कोलकत्त्यातील हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''chaska_food_ka'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच अनेक लाईक्स मिळालेले आहेत. मात्र भारतीय स्ट्रीट फूडमध्ये नवनवीन फ्यूजन डिश सतत येत असतात. काही सुपरहिट होतात तर काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

नेटीझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, "हे पाहून माझा विश्वासच उडाला! लोक अश्याही गोष्टी खातात?" तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय राव बघावे लागते'' तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Foodie Viral Video
Street Food Viral Video: जबरदस्त! पराठा हवेत गरगर फिरला, अन् तव्यावर फिरला; हटके VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com