Gujarat Vadodara car accident Saam Tv News
देश विदेश

लेकीसाठी रंग घेण्यासाठी निघाली, वाटेत काळ आडवा, धनवान बापाच्या पोरानं चिरडलं, आईचा मृत्यू; थराराक Video

Vadodara Car Accident : रक्षित चौरसिया असं या चालकाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तो वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेत आहे.

Prashant Patil

गांधीनगर : गुजरातमधील वडोदरा शहरात एक भीषण अपघात झाला आहे. एका २० वर्षीय तरुणाने आपल्या कारने चार जणांना उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास कारलीबाग परिसरात घडली आहे.

अपघातात कारणीभूत असलेला ड्रायव्हर हा अतिप्रमाणात दारु पिलेला होता. अपघातानंतर तो कारमधून बाहेर पडला आणि 'आणखी एक राऊंड' असं ओरडायला लागला. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्या कारमुळे जखमी झालेले लोक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले होते.

रक्षित चौरसिया असं या चालकाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तो वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेत आहे. सध्या पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील दुसरा आरोपी, जो कारचा मालक आहे आणि जो अपघाताच्या वेळी रक्षित चौरसियासोबत होता, त्यालाही अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. मित चौहान असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो वडोदराचा रहिवासी असून एका खासगी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेली व्यक्ती कारमधू बाहेर पडताना दिसत आहे. बाहेर पडताच ती व्यक्ती 'अजून एक राऊंड' असं ओरडत रस्त्यावर चालू लागतो आणि काही वेळाने 'ओम नमः शिवाय'चा जप सुरू करतो.

घटनेच्यावेळी कारचा वेग ताशी १२० किमी होता. या भरधाव कारने दोन गाड्यांना धडक दिली आणि दुचाकीस्वार खाली पडले. त्यानंतर कार त्यांना फरफटत घेऊन गेली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हेमानी पटेल असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून ती आपल्या अल्पवयीन मुलीसह होळीचे रंग खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. बाकी तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT