Gujarat Politics Saam Digital
देश विदेश

Gujarat Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; गुजरातच्या बड्या नेत्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Gujarat Politics News : लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अंबरिश डेर आणि ज्येष्ठ आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Sandeep Gawade

Gujarat Politics

लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे अंबरिश डेर आणि ज्येष्ठ आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात युनिटचे कार्याध्यक्ष अंबरिश डेर आणि ज्येष्ठ आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.

काही दिवसांपूर्वीच राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारन राठवा यांनी त्यांच्या मुलासह आणि मोठ्या संख्येने समर्थकांसह सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा दोन तीन दिवसात गुजरातमध्ये प्रवेश करत आहे. त्याआधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. पोरबंदर मतदारसंघाचे आमदार असलेल्या मोधवाडिया यांनी सोमवारी संध्याकाळी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला होता. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने राजीनामा स्वीकारल्याची पुष्टी दिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमधील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात प्रभावशाली विरोधी नेत्यांपैकी एक असलेले मोधवाडिया जवळपास ४० वर्षे काँग्रेसमध्ये होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. २०२२ च्या निवडणुकीत मोढवाडिया यांनी पोरबंदर विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबू बोखिरिया यांचा पराभव केला होता.

गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा असून मोधवाडिया यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 14 झाली आहे. चिराग पटेल आणि सीजे चावडा यांच्यानंतर गेल्या चार महिन्यांत राजीनामा देणारे मोधवाडिया हे काँग्रेसचे तिसरे आमदार आहेत. पटेल यांनी डिसेंबरमध्ये तर चावडा यांनी जानेवारीत राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात मोढवाडिया यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राण-प्रतिष्ठा महोत्सवाचे निमंत्रण नाकारून पक्षाच्या नेत्यांनी केवळ भारतातील जनतेच्या भावना दुखावल्या नाहीत तर पक्षालाही दुखावलं आहे. पक्षाला लोकभावनांचे आकलन करता आलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT