China Defence Budget
China Defence Budget Saam Digital

China Defence Budget : चीनने भारतापेक्षा कितीतरी पटीने वाढवलं संरक्षण बजेट; भारतासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात टेन्शन वाढलं

India Vs China : चीनने यावर्षीही संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्क्यांची वाढ कायम ठेवली आहे. चीनचं संरक्षण बजेट जगातील दुसरं सर्वात मोठं बजेट मानलं जातं. चीन दरवर्षी २३० अरब डॉलर्स संरक्षणावर खर्च करतं.

China Defence Budget

भारताचा शेजारी देश आणि जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने यावर्षीही संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्क्यांची वाढ कायम ठेवली आहे. त्यामुळे भारत, तैवान, दक्षिण चीन समुद्रातील देशांसह अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे. चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही संरक्षण बजेटमध्ये केलेली मोठी वाढ केली आहे. त्यामुळे चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षेबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनचं संरक्षण बजेट जगातील दुसरं सर्वात मोठं बजेट मानलं जातं.

चीनचं संरक्षण बजेट भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा तीन पटीने अधिक असलं तरी, अमेरिकेच्या बजेटपेक्षा खूपच कमी आहे. जगात सर्वात मोठं संरक्षण बजेट अमेरिकेचं असून ८४२ अरब डॉलरची तरतूद असते. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो, चीन दरवर्षी २३० अरब डॉलर्स संरक्षणावर खर्च करतं. तर भारताचं संरक्षण बजेट ७८ अरब डॉलर म्हणजे ६.२१ लाख कोटी रुपये आहे.

चीनचे शेजारी देश भारत आणि जपानमध्ये अनेक वर्षांपासून तणाव राहिला आहे. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे अमेरिकेसोबतही संबंध बिघडलेले आहेत. त्यासोबतच दक्षिण चीन समुद्र आणि तैवानवर चीन दावा सांगत आला आहे. चीनच्या वाढत्या संरक्षण बजेटमध्ये हाय टेक सैन्य टेक्नॉलॉजीमध्ये वाढ, स्टील्थ लढाऊ विमान, विमानवाहू जहाज आणि अण्वस्त्रांचा देखील समावेश आहे, त्यामुळे शेजारी देशांची डोकेदुखी वाढली आहे.

जिनपिंग यांनी चीनच्या सैन्याला अमेरिकेसारखं आधुनिक बनवण्याची शपथ घेतली आहे. २०२७ मध्ये चीनी पीएलएला १०० वर्ष पूर्ण होत असून तोपर्यंत चीन तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, असं मानलं जात आहे. इंडो पॅसिफिकवरही आपलं प्रभूत्व प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा असेल. हिंदी महासागर, प्रशांत महासागरला जोडणाऱ्या काही भागाला इंडो पॅसिफिक क्षेत्र म्हटलं जातं. ज्यामध्ये पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी, हिंदी महासागर, पश्चिम आणि मध्य प्रशांत महासागरचा समावेश आहे.

China Defence Budget
World Richest Person: श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ; एलन मस्कने गमावले पहिले स्थान; आता सर्वात श्रीमंत कोण?

सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत चीनचे सैन्य सर्वात मोठे आहे. तसेच, चिनी सैन्यात दोन रॉकेट फोर्स आहेत आणि हे रॉकेट फोर्स अण्वस्त्र ऑपरेशनची कमान सांभाळतं. चीन गुपचूप रॉकेट शक्ती वाढवत असल्याचा आरोप चीनवर होत आहे. संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे की चीनचे संरक्षण बजेट हे नोंदवलेल्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. चीनने आपल्या लष्करी संशोधन आणि विकास बजेटचा संरक्षण बजेटमध्ये समावेश केला नाही. मात्र, एकीकडे चीन आपले लष्करी सामर्थ्य सातत्याने वाढवत असतानाच दुसरीकडे त्याच्यासमोरील आव्हानेही वाढली आहेत. अलीकडेच चीनने कोणतेही कारण न देता आपल्या संरक्षण प्रमुखाला पदावरून हटवले होते. अनेक उच्चपदस्थ जनरलही बदलण्यात आले आहेत. यावरून चीनच्या सैन्यातही अडचणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

China Defence Budget
NIA Raid : तुरुंगातून देशविरोधी कट; कैद्यांना बनवलं जात होतं दहशतवादी, NIAची ७ राज्यांत छापेमारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com