NIA Raid : तुरुंगातून देशविरोधी कट; कैद्यांना बनवलं जात होतं दहशतवादी, NIAची ७ राज्यांत छापेमारी

NIA Raid In 7 States: बेंगळुरू आणि तामिळनाडूसह ७ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. या सात राज्यांमधील १७ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
NIA Raid
NIA RaidNIA

NIA Raid In 7 States :

लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या दहशतवाद्यांकडून कैद्यांना कट्टरपंथी बनवण्याच्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने ७ राज्यांमध्ये छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून बेंगळुरू आणि तामिळनाडूसह ७ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. या सात राज्यांमधील १७ ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचं एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. (Latest News)

बेंगळुरू शहर पोलिसांनी ७ पिस्तूल, चार हातबॉम्ब, एक मॅगझिन, ४५ काडतुसे आणि चार वॉकीटॉकी जप्त केल्यानंतर (१८ जुलै २०२३) गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला ५ जणांना अटक करण्यात आलीय. या ५ लोकांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आलीय. या वर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने बेंगळुरू लष्कर-ए-तैयबा (एलईटी) तुरुंगात कट्टरतावाद आणि 'फिदाईन' (आत्मघाती) हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन फरारांसह ८ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

आठही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हे आहेत आरोपी

या प्रकरणी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी टी. नसीर हा आरोपी आहे. जो तुरुंगात आहे. नसीरने बेंगळुरू सेंट्रल जेलमध्ये पाच जणांना कट्टरपंथी बनवले होतं. तर आरोपी जुनैद अहमद उर्फ ​​जेडी आणि सलमान खान परदेशात पळून गेल्याचा संशय आहे. सय्यद सुहेल खान उर्फ ​​सुहेल, मोहम्मद उमर उर्फ ​​उमर, जाहिद तबरेझ उर्फ ​​जाहिद, सय्यद मुदस्सीर पाशा आणि मोहम्मद फैसल रब्बानी उर्फ ​​सदाथ अशी इतरांची नावे आहेत. एनआयएने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा ताबा घेतला होता आणि त्यानंतर जुनैद अहमदच्या घरासह अनेक ठिकाणी झडती घेतली होती.

NIA Raid
Hair Smuggling: ईडीची मोठी कारवाई! १२००० कोटींच्या मानवी केसांच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; चीन कनेक्शनही आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com