Lok Sabha Election: माजी न्यायाधीश गंगोपाध्याय भाजपमध्ये करणार प्रवेश, या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

West Bengal : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Calcutta High Court judge Justice Abhijit Gangopadhyay
Calcutta High Court judge Justice Abhijit GangopadhyaySaam Tv
Published On

Calcutta High Court Judge Justice Abhijit Gangopadhyay Will Join Bjp and Contest Elections from This Lok Sabha Constituency:

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी (७ मार्च रोजी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, ७ मार्च रोजी दुपारी एक कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

अभिजित गंगोपाध्याय म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये केवळ भाजप तृणमूल काँग्रेसशी लढू शकते. याची न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पत्र आणि त्याची प्रत देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांना पाठवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Calcutta High Court judge Justice Abhijit Gangopadhyay
DK Shivkumar: काँग्रेसच्या संकटमोचकांना सर्वोच्च दिलासा! डी. के शिवकुमार यांच्यावरील मनी लाँन्ड्रिंग प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

न्यायमूर्ती गंगोपाध्याय मंगळवारी सकाळी उच्च न्यायालयात त्यांच्या चेंबरमध्ये पोहोचले, त्यानंतर त्यांच्या वतीने राजीनामा पत्र पाठवण्यात आले. न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी रविवारी जाहीर केले होते की, ते ५ मार्च रोजी (कोलकाता उच्च न्यायालयाचे) न्यायाधीश पदाचा राजीनामा देणार आहेत.  (Latest Marathi News)

न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुनावणीशी संबंधित होते. ते यावर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये निवृत्त होणार होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्यातील सत्ताधारी टीएमसीवरही हल्ला चढवला होता.

गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तमलूक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. तामलूक ही जागा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2009 पासून ही जागा टीएमसी जिंकत आली आहे.

बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. अधिकारी तेव्हा टीएमसीचे नेते होते. टीएमसी सोडल्यानंतरही २०१६ च्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा उमेदवार येथून विजयी झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com