Morbi Bridge Collapsed Viral Video Saam TV
देश विदेश

Morbi Bridge Collapsed : 'त्या' तरुणांमुळेच पूल कोसळला? थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामधील दृश्य थरकाप उडवणारी आहे.

Satish Daud

मोरबी : रविवारी सायंकाळी गुजरातमध्ये  (Gujarat) घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता अचानक पूल कोसळला आणि शेकडो लोक पाण्यात पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास १४० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामधील दृश्य थरकाप उडवणारी आहे. (Morbi Bridge Collapsed Viral Video)

मोरबी पूल पडतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. इतकंच नाही तर काही तरुण पूलाला लाथा देखील मारताना दिसत आहे. या तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच पूल नदीत कोसळला असल्याचा दावा अनेकजण करत आहे.

व्हिडीओत काय आहे?

30 सेकंदाच्या या व्हिडीओत मोरबी पूलावर मोठ्या प्रमात गर्दी झाल्याचं दिसतंय. पूलावर इतर लोकं फोटोशूट करीत असताना, या गर्दीतील काही तरुण हे पुलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचंही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात.

या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच, या तरुणांमुळे मोरबी नदीचा पूल कोसळला असल्याचा आरोप अनेकजण करत आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जण मृत्युमुखी पडलेत. मृतांमध्ये लहान मुलं, महिलांचाही देखील समावेश आहे.

PM मोदींकडून मृतांचा कुटुंबीयांना मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT