Congress : खोक्यांचा वाद आणखीच पेटणार? रवी राणांच्या दिलगिरीनंतर काँग्रेस नेत्याला वेगळीच शंका

रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर कॉग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
ravi rana and Bacchu Kadu
ravi rana and Bacchu Kadusaam tv
Published On

MLA Ravi Rana vs Bacchu Kadu News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता जवळपास मिटला असल्याचं बोललं जातंय. कारण, रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझे शब्द मागे घेऊन विषय संपवतो, असं रवी राणांनी  (Ravi Rana) म्हटलंय. दरम्यान, रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर कॉग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

ravi rana and Bacchu Kadu
Eknath Shinde : शिंदे गटातील आमदार-खासदारांच्या सुरक्षेत वाढ; अमृता फडणवीसांनाही वाय दर्जाची सुरक्षा

'रवी राणांनी बच्चू कडूंवरील आरोपानंतरच्या वादावर एकतर्फी पध्दतीने पडदा टाकता येणार नाही.‌ रवी राणांचा खोक्यांचा आरोप केवळ बच्चू कडूंवर नाही तर मविआ सरकार पाडण्यासाठी पार पडलेल्या सगळ्या प्रक्रियेवर आरोप केला आहे. खोके देण्याचा आरोप हा 'महाशक्ती' वर जातो. याची चौकशी होणे गरजेचे आहे', असं सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा यांच्यात जोरदार वाद सुरू होता. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रूपये घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. रवी राणा यांच्या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले होते. माझ्यावर केलेल्या आरोपांचे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा मोठा गौप्यस्फोट करेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.

इतकंच नाही तर, आपल्यासोबत १२ आमदार असल्याचा इशाराही त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला होता. दरम्यान, बच्चू कडू यांच्या इशाऱ्यांनंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं. यावेळी शिंदेंनी दोघांसोबत तब्बल अडीज तास चर्चा केली.

मात्र, या चर्चेनंतर वादावर तोडगा निघाला नसल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आलं होतं. दरम्यान, सोमवारी रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलताना मी माझे शब्द मागे घेतो, असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर हा वाद मिटला असल्याचं बोललं जातंय. मात्र, कॉग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत या वादावर एकतर्फी पध्दतीने पडदा टाकता येणार नाही.‌ रवी राणांचा खोक्यांचा आरोप केवळ बच्चू कडूंवर नाही तर मविआ सरकार पाडण्यासाठी पार पडलेल्या सगळ्या प्रक्रियेवर आरोप केला आहे. खोके देण्याचा आरोप हा 'महाशक्ती' वर जातो. याची चौकशी होणे गरजेचे आहे', असं म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com