BJP celebrates a sweeping victory in Gujarat civic polls after securing a massive majority in Ahmedabad and other key cities. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! भाजपचा दणदणीत विजय; विरोधकांचा सुपडासाफ, 192 पैकी 158 जागा जिंकल्या

Gujarat Municipal Election Results 2026 Full Details: गुजरातमधील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय मिळवला आहे. अहमदाबादमध्ये 192 पैकी 158 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा सुपडासाफ केला आहे.

Omkar Sonawane

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. 15 महापालिकांवर भाजपने झेंडा फडकवत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. गुजरातमध्ये 26 एप्रिल रोजी 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका, 34 जिल्हापंचायती आणि 260 तालुका पंचायतीसाठी मतदान पार पडले. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे विधानसभेची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

अहमदाबाद महानगपलिकेत भाजपने घवघवीत यश मिळवत 192 पैकी 158 जागा जिंकून पक्षाने गुजरातच्या या सर्वात मोठ्या शहरात आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. तर सूरत महानगरपालिकेत भाजपने 127 पैकी 115 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसने एक जागा जिंकून पाच वर्षानंतर आपले खाते उघडले.

34 जिल्हा पंचायतीमध्ये एकूण 1090 जागा होत्या. यापैकी 568 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 77 आणि इतरांनी 30 जागा जिंकल्या. 5234 जागा असलेल्या 260 तालुका पंचायतीमध्ये भाजपने 2, 397 काँग्रेसने 591 आणि इतरांनी 329 जागा जिंकल्या. तर राजकोटमध्ये 72 पैकी 65 जागा भाजपने जिंकल्या असून महापालिकेत विरोधी पक्षाला जागाच ठेवली नाहीये.

दरम्यान सूरेंद्रनगर येथे 52 पैकी 51 ठिकाणी भाजप विजयी झाली असून काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. 52 जागांच्या वापी महानगरपालिकेत भाजपने 37 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला 11 जागा जिंकल्या. मोरबी येथे सर्व 52 जागा भाजपने जिंकल्याने विरोधकांना क्लीन स्वीप केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT