Manasvi Choudhary
पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेला राजकोट किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची सध्या मोठी गर्दी झाली आहे.
यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणमध्ये पर्यटक भेट देत आहेत, ऐतिहासिक किल्ले पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे जलक्रिडा खेळ तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याने पर्यटक राजकोट किल्ल्याकडे वळत आहेत.
वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील साहसी खेळ बंद असल्यामुळे पर्यटकांनी राजकोट किल्ल्याला पंसती दर्शवली आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजीमहाराजाचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक सध्या गर्दी करू लागले आहेत.
25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि 1667 पर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत हा किल्ला बांधला गेला.
परकीय वसाहती करणाऱ्यांच्या म्हणजेच इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे आणि जंजिऱ्याच्या सिद्दींचा उदय रोखणे हा राजकोट किल्ला उभारण्यामागचा मुख्य उद्देश होता.
शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.