Husband Arrested for Killing Young Wife Saam Tv
देश विदेश

लग्नानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध, दुसऱ्या प्रेमासाठी बायकोचा खून; 'असा' झाला हत्येचा उलगडा

Husband Arrested for Killing Young Wife: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात नवरा - बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघड. अवैध संबंधातून पतीनं १९ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भूज तालुक्यातील नाना वरमोरा गावातून नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षीय तरूणानं आपल्याला पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह त्याच्या शेतातील विहिरीत फेकून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे त्याच गावातील दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत त्याला ताब्यात घेतलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुलसुम (वय वर्ष १९) असे मृत महिलेचं नाव आहे. तर, पती मोहसीन मामन असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री कुलसुमच्या वडिलांनी जावयाविरोधात कच्छ पश्चिमच्या माधापार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. एफआयआरनुसार, कुलसुमचा २ वर्षांपूर्वी मोहसिनशी विवाह झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, मोहसिनचे लग्नापूर्वी सुमारे ५ वर्षे त्याच गावातील दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते. या कारणामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत. मोहसिन कुलसुमला त्याच्या अवैध संबंधात अडथळा मानत होता. मोहसिनने शुक्रवारी रात्री कुलसुमचा धारदार शस्त्राने गळा कापला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून शेतातील विहिरीत फेकून दिला.

कुलसुम गायब झाल्याचे समजताच हा प्रकार उघडकीस आला. तिच्या कुटुंबाने कुलसुमचा शोध सुरू केला. शेतातील विहिरीत कुलसुमचे कपडे पाण्यात तंरगताना दिसले. नंतर विहिरीतच कुलसुमचा मृतदेह सापडला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तपास अधिकारी ए.के. जडेजा म्हणाले की, लग्नानंतर मोहसिनने दुसऱ्या महिलेशी पुन्हा संबंध सुरू केले होते. यामुळे त्याने आपल्या पतीचा काटा काढला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणात आणखी कोण सामील होते का? याचा तपास पोलीस करीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT