PM Modi Degree SAAM TV
देश विदेश

Kejriwal Fines For PM Modi Degree: PM मोदींची डीग्री मागणं केजरीवालांना भोवलं, गुजरात हायकोर्टानं २५ हजार दंड ठोठावला; तो आदेशही रद्द

Arvind Kejriwal Fines for Asking PM Modi Degree : PM नरेंद्र मोदी यांच्या पदव्युत्तर प्रमाणपत्रासंदर्भात अरविंद केजरीवाल यांना माहिती देण्याचा CIC चा आदेश गुजरात हायकोर्टानं रद्द केला.

Nandkumar Joshi

Arvind Kejriwal Fines for Asking PM Modi Degree : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्युत्तर प्रमाणपत्रासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहिती देण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) गुजरात विद्यापीठाला दिलेला आदेश आज, शुक्रवारी गुजरात हायकोर्टानं रद्द केला. केंद्रीय माहिती आयोगाने यासंदर्भात २०१६ मध्ये विद्यापीठाला हे आदेश दिले होते. तसेच हायकोर्टाने यावेळी केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंडही ठोठावला.

गुजरात हायकोर्टानं म्हटलं की, 'पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र दाखवण्याची काही गरज नाही.' न्या. बिरेन वैष्णव यांनी हा आदेश दिला.  (Latest Marathi News)

हायकोर्टानं यावेळी केंद्रीय माहिती आयोगाचा आदेशही रद्द केला. तसेच यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपये दंडही ठोठावला. ही रक्कम गुजरात राज्य कायदा सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे आदेशही केजरीवाल यांना दिले.

पदवी प्रमाणपत्र दाखवण्याला विरोध का केला? : केजरीवाल

गुजरात हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ट्विटमधून नाराजी व्यक्त केली आहे. आपले पंतप्रधान किती शिकलेत हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही का? असा सवाल त्यांनी केला.

कोर्टात पदवी प्रमाणपत्र दाखवण्यास इतका विरोध का केला? अशिक्षित किंवा कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी खूपच धोकादायक आहेत, असंही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गुजरात विद्यापीठानं दाखल केली होती याचिका

केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाविरोधात गुजरात युनिव्हर्सिटीने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आयोगाने पंतप्रधान मोदींच्या पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राची माहिती देण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT