Kshama Bindu Saam Tv
देश विदेश

सात फेरे, हनिमूनलाही जाणार पण... नवरदेवाशिवायचं! ही तरुणी का करतेय स्वतःशीच लग्न?

विशेष म्हणजे गुजरातची क्षमा सर्व रितीरिवाजांनी लग्न करणार आहे. पण लग्नात वरात असणार नाही. हे बहुधा गुजरातमधील पहिले एकल विवाह म्हणून सांगितले जात आहे.

वृत्तसंस्था

लग्नाला घेऊन मुलींची वेगवेगळी स्वप्ने असतात. त्यांच्या अनेक इच्छाही असतात. प्रत्येक मुलीप्रमाणेच २४ वर्षीय क्षमा बिंदूही तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. तिचे लग्न 11 जून रोजी आहे. तिने लेहेंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. पण खास गोष्ट म्हणजे तिचे लग्न नावरदेवाशिवायचं होणार आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं? हो, पण हे खरं आहे. आता तुम्हाला वाटेल की नवदेवच नाही म्हणल्यावर ही मुलगी लग्न कसेकाय करणार? खरतर क्षमा दुसऱ्याशी व्यक्तीशी नाही तर ती स्वतःशीच लग्न करणार आहे.

खास गोष्ट ही देखील आहे की, क्षमा सप्तपदी सोबत सर्व रीती रिवाजांसोबत लग्न करत आहे. ती लग्नात सिंदूर पण भरणार आहे. पण लग्नात नवरदेव नसेल ना वरात असेल. गुजरातमधील या लग्नाला पहिले सोलो लग्न (एकल विवाह) म्हणले जात आहे. (Sologamy Gujarat)

का स्वतःशीच लग्न करतेय क्षमा?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत क्षमाने सांगितलं की, तिला कधीच लग्न करायचे नव्हते. पण नवरी बनण्याचे तिचे स्वप्न होते. म्हणूनच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तिने सांगितले, मी ऑनलाईन पाहिलं की याआधी कुठल्या देशात महिलेले स्वतःशीच लग्न केले आहे का ? पण तिला असे कोणीच सापडले नाही. क्षमा म्हणाली, देशात सोलो लग्न करणारी कदाचित ती पहिली मुलगी असेल आणि असं करून ती एक उदाहरण बनेल. (India's First 'sologamy'?)

...यामुळे मी स्वतःबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला;

क्षमा प्रायव्हेट फार्ममध्ये नोकरी करते. तिने सांगितले, स्वत:शी लग्न करणे ही स्वत:शी असलेली प्रेम आहे, बिनशर्त केलेलं प्रेम आहे. ही स्व-स्वीकृतीची कृती आहे. लोक अश्या कोणत्या व्यक्तीशी लग्न करतात ज्यांच्यावर ते प्रेम करतात. मी स्वतःवर प्रेम करते. यामुळे मी स्वतःबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Gujarat woman set to marry herself)

हे देखील पाहा-

हनिमूनला ही जाणार क्षमा;

ती म्हणाली, 'स्वतःशी लग्न करणे काही लोक अप्रासंगिक मानू शकतात; पण मला दाखवायचे आहे की स्त्रिया सुद्धा महत्त्वाच्या आहेत. ती म्हणते, माझे आईवडील मोकळ्या विचारांचे आहेत. त्यांनी मला या लग्नासाठी आशीर्वाद दिला आहे. क्ष्माचे लग्न एक मंदिरात पार पडणार आहे. लग्नासाठी तिने स्वतःच 5 वचणे लिहिली आहेत. एवढेच नाही तर लग्नानंतर क्षमा लग्नानंतर हनिमूनलापण जाणार आहे. ती 2 आठवड्यांसाठी गोव्याला हनिमूनला जात आहे.

Sologamy म्हणजे काय?

सोलोगॅमी किंवा ऑटोगॅमी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे स्वतःशी लग्न. एकलविवाहाच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की स्वतःशी लग्न करणे म्हणजे स्वतःचे महत्त्व पटवून देणे होय. हे आनंदी जीवनाकडे घेऊन जाते. याला स्वविवाह असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT