Gujarat Crime News
Gujarat Crime News  Saam TV
देश विदेश

Gujarat Crime News: आधी कबरीतून बाहेर काढला मृतदेह; नंतर केलं भयानक कांड, घटनेनं परिसरात खळबळ

साम टिव्ही ब्युरो

Gujarat News: गुजरातच्या थानगड परिसरातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे एका दीड वर्षांच्या मुलीच्या मृतदेहावर अज्ञात नराधमाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या थानगड परिसरात एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. पीडितेच्या हृदयात जन्मजात छिद्र असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना २५ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कुटुंबीयांकडून तिच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं.

दरम्यान, पीडितेचे वडील दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला दफन केलेल्या जागी गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेचा मृतदेह कबरीबाहेरील मातीच्या थडग्यावर होता. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. या घटनेची माहिती (Crime News) पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जेव्हा पोलिसांनी (Police) पीडितेचा मृतेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तेव्हा डॉक्टरांनीही प्रथमदर्शनी तो पाहून बलात्काराची शंका व्यक्त केली. डॉक्टरांनी जेव्हा पीडितेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. तेव्हा अहवाल पाहून त्यांच्याही पायाखालची जमिनच सरकली. पीडितेच्या मृतदेहावर चार ते पाच वेळा बलात्कार झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात विकृताविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे भयानक कांड नेमकं कुणी केलं याचा तपास पोलीस करीत आहे. एका दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मृतदेहावर बलात्कार झाल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या विकृताचा शोध सुरू केला असून लवकरच तो पकडला जाईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT