Gujarat Crime Saam Tv
देश विदेश

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Gujarat Crime: गुजरातमध्ये १५ वर्षांच्या मुलीवर मामा आणि त्याच्या मुलाने बलात्कार केला. मुलीला मोबाइलची सवय लागली होती. ही सवय सुटावी म्हणून तिच्या आईने तिला आजोळी पाठवले होते. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • अल्पवयीन मुलीवर मामा आणि त्याच्या मुलाने केला बलात्कार

  • मोबाइलची सवय सुटावी यासाठी आईनेच तिला आजोळी पाठवले होते

  • मुलीने घरी आल्यानंतर मोठ्या बहिणीला घटनेची माहिती दिली

गुजरातमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर मामा आणि मामेभावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गुजरातच्या अहमदाबातमध्ये घडली. १५ वर्षांच्या मुलीला मोबाइलची सवयी लागली होती. अभ्यास सोडून ती सतत मोबाइलचा वापर करत होती त्यामुळे तिची मोबाइलची सवयी मोडावी यासाठी तिच्या आईने तिला मामाच्या घरी पाठवले. त्याठिकाणी या मुलीसोबत भयंकर घडलं. मामा आणि त्याच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिने आपल्या मोठ्या बहिणीला मामा आणि त्याच्या मुलाने तिच्यासोबत केलेल्या भयंकर कृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित मुलगी आई आणि बहिणीसोबत राहते. तिची आई एकटीच कुटुंबाचा सांभाळ करते.

पीडित मुलीला मोबाइलची सवय लागली होती. तिच्या काळजी पोटी आणि तिची मोबाइलची सवय मोडावी यासाठी तिच्या आईने तिला दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा पीडिच मुलीची तिची आई मामाला फोन करून तिची विचारपूस करायची तर तिचा मामा तिला ती ठिक आहे असे सांगायचा आणि मुलगी अभ्यास देखील व्यवस्थित करते असे सांगायचा. पीडित मुलगी जेव्हा दोन महिन्यांनंतर घरी परत आली तेव्हा तिने आपल्या मोठ्या बहिणीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा देखील विचार केला होता.

पीडित मुलगी जेव्हा आजोळी गेली तेव्हा तिच्या मामाने तिला विचित्र पद्धतीने स्पर्श केला. तर तिच्या मामाच्या मुलाने अनेक वेळा झोपताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. ती मामा आणि त्याच्या मुलीला विरोध करू शकली नाही आणि तिच्या आईला देखील काहीच सांगू शकली नाही. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee And Sugar Face Scrub: घरीच बनवा 'कॉफी फेस स्क्रब', चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार? शिवसेना खासदारांची मोर्चेबांधणी सुरु

Priya - Umesh : 'हे काय नवीन?'; प्रिया बापट अन् उमेश कामत चाळीशीत करणार 'ही' गोष्ट, VIDEO शेअर करत दिली माहिती

...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब फेका, पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली

भोंदू खरातकडे ₹१५०० कोटींची संपत्ती, शेकडो एकर जमीन कुठे कुठे लुबाडली? SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT