Congress Leader Viral Video Saam TV
देश विदेश

कॉंग्रेस नेता तरुणीबरोबर रुममध्ये सापडला; पत्नीनं बनवला व्हिडिओ, अन्...

व्हायरल झालेल्या व्हिडिओत भरतसिंह सोलंकी हे एका तरुणीसोबत खोलीत दिसत आहे

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या गुजरात येथील एका कॉंग्रेस (Congress) नेत्याचा तरुणीबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कॉंग्रेस नेते भरतसिंह सोलंकी (Bharatsinh Solanki) हे एका तरुणीबरोबर खोलीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, खोलीचा दरवाजा उघडून सोलंकी यांच्या पत्नी रेशमा सोलंकी अचानक आत आल्या. आपल्या पतीला परक्या बाईसोबत बघून भरतसिंह सोलंकी यांच्या पत्नीने मोठा कहर केला. दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओत भरतसिंह सोलंकी हे एका तरुणीसोबत खोलीत दिसत आहे. व्हिडिओमध्ये भरत सिंह सोलंकी यांनी टी-शर्ट आणि हाफ पँट घातलेला दिसत आहे. त्यांच्यासोबत खोलीत असलेल्या तरुणी सुद्धा टी-शर्टमध्ये दिसत आहे. दरम्यान, दोघेही बंद खोलीत असताना अचानक भरतसिंग सोलंकी यांच्या पत्नी रेश्मा सोलंकी या खोलीचा दरवाजा उघडून आत येतात. त्यानंतर भरतसिंग आणि त्यांच्या पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. इतकंच नाही तर, रेश्मा पटेल यांच्यासोबत काही लोक असून हे लोकही घरात जबरदस्तीने घुसताना दिसत आहेत. त्यानंतर या अनोळखी तरुणीचे केस पकडून रेश्मा या तिला मारझोड करताना दिसत आहेत.

तर मध्ये पडून या तरुणीला वाचवण्याचा सोलंकी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण रेश्मा या ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्या सोलंकी यांना धक्के मारून बाजूला सारताना दिसत आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्लिपमध्ये या अनोळखी तरुणीला मारहाण केली जात असल्याचं दृश्य दिसत आहे. या तरुणीचे केस ओढून तिला मारहाण करताना रेश्मा पटेल दिसत आहेत. तू माझ्या नवऱ्याला जाळ्यात अडवलं आहेस. तुला मी सोडणार नाही, असा इशाराही रेश्मा यांनी या तरुणीला दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा भरत सिंह सोलंकी यांच्या पत्नी रेश्मा पटेल यांनी बनवला आहे. माझ्या पतीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा आरोप रेश्मा पटेल यांनी केला आहे. दरम्यान, भरतसिंग सोलंकी आणि त्यांच्या पत्नी रेश्मा सोलंकी यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्या पत्नीने भरत सिंह यांना घटस्फोट देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

भरत सिंह सोलंकी आणि त्यांची पत्नी रेश्मा यांच्यातील नात्यात अनेक दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात भरतसिंह सोलंकी यांच्यावर पत्नी रेश्माने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तिने पतीविरुद्ध बोरसद न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. दुसरीकडे, ताज्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सोलंकी यांचे विरोधक त्यांच्यावर विविध आरोप करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT