गॅस लीक झाल्याचे कळले! सारे तिकडे धावले; तिथेच 6 जणांचा घात Saam Tv
देश विदेश

गॅस लीक झाल्याचे कळले! सारे तिकडे धावले; तिथेच 6 जणांचा घात

गुजरात मधील सूरत येथे एका मोठ्या अपघाताची माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : गुजरात मधील (Gujarat) सूरत येथे (Surat) एका मोठ्या अपघाताची माहिती (Accident) समोर आली आहे. शहरातील सचिन भागात केमिकलने भरलेल्या टँकर मधून केमिकल लीक झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये २० हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्यामुळे त्यांना सुरतच्या (Surat) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सचिन परिसरातील जीआयडीसी ची आहे. या परिसरामध्ये रासायनिक (Chemical) कारखाने आहेत. येथे टँकरमध्ये रसायनाची गळती झाली. यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरला होता. हा वायू इतका विषारी होता की ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच अनेक मजुरांना उपचाराकरिता रुग्णालयामध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक ३६२ च्या बाहेर १० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून काही अंतरावर मजूर झोपले होते. या घटनेमध्ये जखमी झालेल्या २० हून जास्त जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून रसायन टाकले जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. सध्या ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यामधून विषारी वायूची गळती सुरू झाली. वायू हवेच्या संपर्कात आला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT