Bhavnagar Fire ANI
देश विदेश

Fire : १५ रुग्णालयांच्या इमारतीत भीषण आग, ५० अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, खिडकी तोडून...

Bhavnagar Samip Complex hospital fire latest update : भावनगरमधील समिप कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे १५ रुग्णालये आणि तेथील इतर कार्यालयांमध्ये खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

Gujrat Bhavnagar Complex Fir Update : गुजरातमधील भावनगर येथील समिप कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबला सकाळी अचानक आग लागली अन् एकच गोंधळ उडाला. कारण, या ठिकाणी १५ रूग्णालये, दुकाने अन् अनेक खासगी कार्यालये आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५० जवान घटानास्थळावर दाखल झाले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. इमारतीमध्ये अडकलेल्या रूग्णांना वाचवण्यासाठी खिडक्या तोडून बचावकार्य करण्यात आले.

आज सकाळच्या वेळी अचानक समिप कॉम्प्लेक्समधून धुराचे लोट अन् आगीचे लोळ येऊ लागले. क्षणात आग वाढली अन् इमारतीत पसरली. आग लागल्यामुळे इमारतीमध्ये असणाऱ्या रूग्णांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. बचाव पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ प्रयत्न केले जात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमारतीच्या तळघरात असणाऱ्या पॅथेलॉजी लॅबमध्ये अचानक आग लागली आणि ती क्षणात इमारतीत पसरली. इमारत काळ्या धुराने व्यापली गेली. कॉम्प्लेक्समधील रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या इमारतीत अनेक रुग्ण, मुले आणि वृद्ध अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ५९ हून अधिक जवान दाखल झाले होते.

आतापर्यंत २० ते २२ जणांना आगीमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. बचाव पथकांनी नाइस चिल्ड्रन हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयांमधील खिडक्या तोडल्या अन् रूग्णांना वाचवले. स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, "आमचे जवान तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या दुर्घटनेत अद्याप जलद गतीने काम केले, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन! चित्ररथातून घडवला गणेशोत्सवाचा अनुभव | VIDEO

Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? मग 'या' चुका आजपासूनच करु नका

Maharashtra Live News Update: पुण्यातील मगरपट्टा भागात टोळक्याचा धुडगूस; मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण

Marathi Movie: प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; 'लग्नाचा शॉट'मधील 'रेशमी बंध' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT