GST Collection  Saam Digital
देश विदेश

GST Collection : एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; GST संकलनात नवा रेकॉर्ड, सरकारच्या तिजोरीत जमा झाले इतके कोटी

GST Collection 2023-24 : एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Sandeep Gawade

GST Collection

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारी तिजोरीशी संबंधित आनंदाची बातमी आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी मोठी आकडेवारी आहे. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.

मार्च महिन्यातील रिफंडवरील निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 18.4 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील मासिक आधारावर सरासरी GST संकलनाची गणना केली तर 2023-24 या आर्थिक वर्षात 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये 1.5 लाख कोटी रुपये होते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मार्च 2024 च्या GST संकलनामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) 34,532 कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) रुपये 43,746 कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) 87,947 कोटी (संकलित झालेल्या 40,322 कोटी रुपयांसह) आयात केलेल्या वस्तूंवर) चा समावेश आहे.

जुनी अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून 1 जुलै 2017 रोजी देशभरात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर देशातील ही सर्वात मोठी कर सुधारणा मानली जात आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, सहा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे देशातील लोकांवरील कराचा बोजा कमी होण्यास मदत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT