Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

Krishnaraaj Mahadik to Contest in Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूरच्या राजकारणात आता नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. कृष्णराज महाडिक हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Krishnaraaj Mahadik
Krishnaraaj MahadikSaam TV
Published On
Summary

कोल्हापूरात महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात

धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक निवडणूकीच्या रिंगणात

कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार

कोल्हापूरच्या राजकारणातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता कोल्हापूरमध्ये म्हाडिक कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. आता धनंजय महाडिकांचे सुपुत्र महापालिका निवडणूक लढवणार आहेत. कृष्णराज महाडिकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Krishnaraaj Mahadik
Satej Patil : जुने नेते घरी, नवखा बाप बनून येतो, पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, सतेज पाटील तोडगा काढणार?

कृष्णराज महाडिक हे भाजप खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र आहेत. ते कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन चेहरा उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कृष्णराज महाडिक हे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Krishnaraaj Mahadik
kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

भाजप कोल्हापूरची महापालिका उमेदवारांची यादी आज किंवा उद्या जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात कृष्णराज महाडिकांचेही नाव असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक नवं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. महापालिकेची निवडणूक १५-१६ जानेवारी रोजी होणार आहे.

कोण आहेत कृष्णराज महाडिक? (Who Is krishnaraaj mahadik Kolhapur)

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक आहेत. विधानसभा निवडणूकीतच कृष्णराज महाडिक उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यानंतर आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. कृष्णराज महाडिक यांना राजकीय वारसा आहे. ते युट्यूबरदेखील आहेत.

Krishnaraaj Mahadik
Rinku Rajguru-Krishnaraaj Mahadik : आधी फोटो आता स्टेटसची चर्चा; रिंकू-कृष्णराजच्या फोटोची इनसाईड स्टोरी, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com