अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Congress News : पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नी लोकं, जुने कार्यकर्ते घरी बसलेले आहेत. वेगळेच नवीन चेहरे काँग्रेस भवनात असतात, असा आरोप तिवारी यांनी केला आहे. आज काँग्रेस नेते पुणे जिल्ह्याचे निरीक्षक सतेज पाटील काँग्रेस भवनात बैठक घेणार आहेत. सतेज पाटील पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोडगा काढणार का? अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सतेज पाटील यांच्या पुण्यातील बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांची नाराजी समोर आली आहे. संघटना वाढवण्यासाठी जे पोषक वातावरण पाहिजे. ते काँग्रेस भवनला नाहीये अशा आरोप काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी केला. आज काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे निरीक्षक सतेज पाटील काँग्रेस भवनमध्ये बैठक घेणार आहेत. निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर सतेज पाटील यांची पहिलीच बैठक आहे. पुण्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोडगा काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
काँग्रेस नेत्याची नाराजी, सतेज पाटील तोडगा काढणार का ?
काँग्रेस भवनात होणाऱ्या बैठकीला शहर काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीपूर्वीच संगिता तिवारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. "जुनी माणसं, जुने कार्यकर्ते घरी बसलेले आहेत. वेगळेच नवीन चेहरे आणि त्या चेहऱ्यांचे नातेवाईक एवढेच काँग्रेस भवनला दिसतात. पण तक्रार कुणाला करायची" असं मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. सामान्य कार्यकर्त्याची अशी अवस्था होत असेल की गेले कित्येक वर्ष काम करायचं आणि नंतर कोणीतरी नवखा माणूस तिथं आपला बाप बनून येत असेल तर ते सहन होत नाही, त्यापेक्षा मग घरी बसलेले बरं असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचं संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे.
सतेज पाटील यांच्या बैठकीआधी संगीता तिवारी यांनी पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड केला. जुने कार्यकर्ते घरी बसलेले, नवे चेहरे आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिलं जातं, असा आरोप केला आहे. सतेज पाटील पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवणार का? गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय, त्यात आता असणाऱ्या नेत्यांमधील वादही चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे सतेज पाटील काँग्रेस भवनात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतात? याकडे पुणे काँग्रेसचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.