Sensex Today | Stock Market
Sensex Today | Stock Market

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स-निफ्टी धडाम, कोट्यवधी रूपये स्वाहा

Share Market Latest News: कोरोना महामारीनंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३९००, निफ्टी १२०० अंकांनी कोसळले. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे बाजारात हाहाकार उडाला.
Published on

Stock market crash India : कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच हाहाकार उडाला. सेन्सेक्स ३९०० अंकांनी कोसळला तर निफ्टी १२०० अंकांनी घसरला. निफ्टीची वाटचाल लोअर सर्किटच्या दिशेने सुरू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बेमुळे भारतीय शेअर बाजारात लाखो कोटी रूपये स्वाह झाले आहेत.

शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली नवीन टॅरिफ धोरणे. ट्रम्प यांच्या या 'टॅरिफ बॉम्बे'मुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून, त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. या धोरणांमुळे आयात-निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः बँकिंग, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला.

Sensex Today | Stock Market
Stock Market Validity : शेअर बाजारात हाहाकार; स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समधून पैसे काढावेत का?

गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारातील चढ-उतारांचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असू शकते, परंतु जर जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली तर बाजाराला सावरायला वेळ लागू शकतो. या परिस्थितीत गुंतवणूकदारांना संयम ठेवण्याचा आणि घाबरून निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. शेअर बाजारातील हा हाहाकार लवकर थांबेल, अशी आशा सर्वांना आहे.

Sensex Today | Stock Market
Stock Market Today : शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स?

कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. ही घसरण फक्त भारतामध्येच नाही तर आशियाई बाजारपेठेत दिसून आली. आशियाई शेअरबाजारात सरासरी ९ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. हाँगकाँग, चीनसह सर्वच शेअर शेअर बाजारात कोट्यवधि रूपयांची राखरांगोळी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com