Google Play Store New Logo Twitter/@GooglePlay
देश विदेश

Google Play Store ला 10 वर्षे पूर्ण! गुगल प्ले स्टोअरवर मिळतायत 10x पट अधिक Play Points

Google Play Store New Logo |१० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगल प्ले स्टोअरवर सर्व यूजर्सना १० पट अधिक गुगल पॉईंट्स दिले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अॅन्ड्रॉईड अॅप्स जिथून डाऊनलोड केले जातात, त्या गुगल प्ले स्टोअरला (Google Play Store) आज, २६ जुलै २०२२ ला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुगलने आपलं प्रोडक्ट असलेल्या गुगल प्ले स्टोअरसाठी नवा लोगो (New Logo) जाहीर केला आहे, सोबतच गुगल प्ले स्टोअरमध्ये अनेक बदलही केले गेले आहेत. १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगल प्ले स्टोअरवर सर्व यूजर्सना १० पट अधिक गुगल पॉईंट्स दिले जात आहेत. (Google Play Store News)

हे देखील पाहा -

कसा आहे गुगल प्ले स्टोअरचा नवा लोगो?

गुगल (Google) प्ले स्टोअरच्या नवीन लोगोच्या त्रिकोणांमध्ये निळ्या, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे चार भाग देण्यात आले आहेत. हा लोगो आता भारतातील यूजर्सना दिसेल. प्रमोशनसाठी, 25 जुलैपासून गुगल प्ले स्टोअरवरच्या खरेदीवर 10 पट अधिक प्ले पॉइंट ऑफर केले जात आहेत.

गुगल प्लेचे उपाध्यक्ष टियान लिम यांनी एका निवेदनात सांगितले की, "त्या वर्षी आम्ही Google Play चे (डिजिटल) दरवाजे उघडले. एका दशकानंतर, 190 हून अधिक देशांतील 2.5 अब्जाहून अधिक लोक अॅप्स, गेम आणि डिजिटल सामग्री शोधण्यासाठी दर महिन्याला Google Play वापरतात आणि दोन दशलक्षाहून अधिक डेव्हलपर त्यांचे व्यवसाय तयार करण्यासाठी आणि जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी Google Play चा वापर करतात.

गुगल प्लेस्टोअरवर मिळतायत १० पट अधिक पॉईंट्स

यामध्ये WhatsApp, PhonePe, True Caller, Amazon India, Flipkart, Disney+ Hotstar, MX Player, JioSaavn, Paytm आणि ShareChat यांचा समावेश आहे. याशिवाय, Google Play त्याच्या रिवॉर्ड प्रोग्रामच्या सदस्यांना अॅपमधील खरेदीवर 10 पट अधिक Play पॉइंट ऑफर केले जात आहेत. गुगलच्या ब्लॉगपोस्टनुसार, 'Play Points सदस्य पॉइंट बूस्टर अॅक्टिव्हेट करून जे काही खरेदी करतात त्यावर 10x पॉइंट मिळवू शकतात. अधिक माहितीसाठी वापरकर्ते Play Points Home च्या Earn टॅबवर क्लिक करुन माहिती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT