Train Ran Without Driver Video: Saamtv
देश विदेश

Viral Video: बापरे! मोटरमनशिवाय सुसाट धावली मालगाडी; ७० किमीचं अंतर पार केल्यानंतर समजलं अन्.. थरारक VIDEO

Gangappa Pujari

Train Ran On Tracks Without Driver Video:

जम्मू काश्मिरमधून एक धक्कादायक अन् तितकाच चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. जम्मू काश्मिरमधून पंजाबकडे निघालेली एक मालगाडी चक्क लोको पायलटशिवाय धावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ७० ते ८० च्या स्पीडने असलेली ही गाडी शेवटी  मुकेरियनजवळ थांबवण्यात आली.

ही संपूर्ण घटना आज सकाळी 7.30 वाजता घडली. पठाणकोटच्या दिशेने निघालेली एक मालगाडी जम्मूतील कठुआ स्थानकावर थांबली होती. गाडीतून काही कामासाठी लोको पायलट उतरला होता. अशातच रोलडाऊनमुळे मालगाडी अचानक पुढे जाऊ लागली आणि बघता बघता गाडीने वेग पकडला. ड्रायव्हरशिवाय ट्रेन धावल्याची माहिती मिळताच संपूर्ण फिरोजपूर विभागात खळबळ उडाली.

या मालगाडीच्या पाठोपाठ तात्काळ अपघात निवारण गाडीही पाठवण्यात आली. घटनेनंतर जम्मू तवी लाइनच्या स्थानकांवर आपत्कालीन हूटर्स वाजू लागले. गाडी तब्बल ७० ते ८० च्या स्पीडने सुसाट पळत होती. प्रशासनाकडून प्रत्येक स्थानकावर ट्रॅक मोकळा करण्याच्या सुचना देण्यात येत होत्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर मुकेरियन पंजाबमधील उची बस्सीजवळ ही गाडी थांबवण्यात यश आले अन् सर्वांनी सुटकेचा नि: श्वास सोडला. मात्र ट्रेन वेळेत थांबवली नसती तर नक्कीच भीषण अपघात घडू शकला असता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा निष्काळजीपणाबाबत रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT