तामिळनाडूच्या प्रत्येक आमदाराला कार आणि १ लाख रुपये मिळणार
तामिळनाडू सरकारचा आमदारांसाठी मोठा निर्णय
मुख्यमंत्री विजय थलपती यांची मोठी घोषणा
आमदारांच्या वाहन खर्चासाठी दरमहा ७५००० रुपये देण्याची घोषणा
आमदारांच्या सहाय्यकासाठी २५००० रुपये देण्यात येणार
तामिळनाडू सरकारने आमदारांसदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी बुधवारी विधानसभेत आमदारांसंदर्भात एक मोठी घोषणा केली. तामिळनाडू सरकार त्यांच्या आमदारांना एक आलिशान कार आणि प्रत्येक महिन्याला १,००००० रुपये देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तामिळनाडू सरकार आता सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात येण्या-जाण्यासाठी आणि सार्वजनिक सेवेच्या कामांसाठी शासकीय वाहने उपलब्ध करून देणार आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमितपणे प्रवास करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारन आमदारांना कार उपलब्ध करून देणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यामागचा उद्देश आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील जबाबदाऱ्या पार पाडताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यांना सार्वजनिक सेवेची कामे अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करणे हा आहे.
तामिळनाडू सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक आमदाराला वाहन खर्च आणि चालकाच्या पगारासाठी दरमहा ७५,००० रुपये दिले जाणार आहे. तसंच, प्रत्येक आमदाराला सहाय्यकासाठी दरमहा अतिरिक्त २५,००० रुपये मिळतील. म्हणजेच एका आमदाराला दरमहा १००००० रुपये मिळणार आहेत. विधानसभेत ही मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सांगितले की, सर्व आमदारांना शासकीय वाहने पुरवली जाणार आहेत. जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली लोकसेवा कर्तव्ये पार पाडू शकतील आणि आपल्या मतदारसंघातील जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतील.
आमदार ज्योतीमणी यांनी आमदारांना आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर थलपती विजय यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. ज्योतीमणी यांनी विधानसभेत सर्व आमदारांना आवश्यक सामग्री आणि वाहनांची मागणी केली होती. आवश्यक संसाधनांशिवाय आमदार आपल्या मतदारसंघात व्यवस्थित काम करू शकत नाहीत असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. ज्योतीमणी यांनी केलेली विनंती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सरकारी वाहनं देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. या निर्णयानंतर आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.