Manasvi Choudhary
तमिळनाडून हे भारताच्या दक्षिणेकडील प्रमुख राज्य आहे.
तामिळनाडू राज्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
तमिळनाडून राज्याची वेगळी ओळख आहे. प्राचीन संस्कृती, भव्य मंदिरे,शास्त्रीय नृत्य आणि दाक्षिणात्य खाद्यपदार्थासाठी हे राज्य प्रसिद्ध आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात तामिळनाडू राज्याला मद्रास प्रेसिडन्सी म्हणून ओळखले जात होते. यानुसार तामिळनाडू राज्याचे जुने नाव मद्रास होते
१४ जानेवारी १९६९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या काळात मद्रास राज्याचे नाव बदलण्यात आले.
राज्यातील लोकांची भाषा आणि राहणीमान यावरून या राज्याला तमिळनाडू हे नाव मिळालं.
तामिळनाडू हा शब्द तमिळ भाषेतून आला आहे.तमिळ आणि नाडू ज्याचा अर्थ तमिळ लोकांचे घर किंवा तमिळ लोकांचा भाग असा होतो.