Manasvi Choudhary
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. आई ही प्रत्येकासाठी महत्वाची व्यक्ती असते. तिचं प्रेम, काळजी शब्दांत व्यक्त करणं कठीण असते.
आईसाठी प्रत्येक दिवस हा खास असला तरी तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात 'मदर्स डे' साजरा केला जातो.
दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' हा दिवस म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी १० मे रोजी सर्वत्र मदर्स डे साजरा केला जाणार आहे. 'मदर्स डे' निमित्त तुम्ही आईला शुभेच्छा, भेटवस्तू देऊ शकता. तिच्यासोबत खास वेळ घालवून तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करू शकता.
सर्वप्रथम मदर्स डे ची सुरूवात अमेरिकेत झाली. अॅना जार्विस या महिलेने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा दिवस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
१९०५ मध्ये आईच्या निधनानंतर अॅना यांनी त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
लोकांना आईचे आपल्या जीवनातील महत्व सांगितले. तसेच तिने आजवर आपल्याला दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात तिच्याविषयी काहीतरी बोलूया या हेतूने तिने आई दिवस साजरा करण्याचे ठरवले.