Vande Bharat Train Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Train: गुड न्यूज! या मार्गावर धावणार १६ कोचची वंदे भारत ट्रेन, कसा असेल मार्ग?

Vande Bharat Train Update: हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेटसमोर आली आहे. ही ट्रेन ८ वरून आता १६ डब्यांची होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

Priya More

देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या वंदे भारत ट्रेन धावतात. वंदे भारत ट्रेनची मागणी वाढत चालली आहे. या ट्रेनला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाच म्हणजे अगदी कमी तासांत आणि आरामदायी प्रवास या ट्रेनमधून करता येतो. त्यामुळे केंद्र सरकारकडून देखील या ट्रेनची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अनेक प्रमुख शहरांना या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडले जात आहे. आता बंगळुरू ते हैदराबाद या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या कोचच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद आणि बंगळुरूच्या मध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनले प्रवाशांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे काचेगुडा - यशवंतपूर - काचेगुडा ही वंदे भारत एक्स्प्रेस आता जास्त प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. कारण या ट्रेनच्या कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, पूर्वी काचेगुडा - यशवंतपूर - काचेगुडा ही वंदे भारत एक्स्प्रेस ८ कोचसह ५३० प्रवाशांच्या क्षमतेसह धावत होती. आता ही वंदे भारत ट्रेन १० जुलैपासून १६ कोचसह धावणार आहे. या ट्रेनमधून आता १,१२८ प्रवाशांना एकाच वेळी प्रवास करता येणार आहे. १० जुलैपासून सुधारित रचना करून ही ट्रेन चालवण्यात येणार आहे

ट्रेन क्रमांक २०७०३/२०७०४ काचेगुडा - यशवंतपूर - काचेगुडा वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला ८ कोचच्या रचनेसह सुरू करण्यात आली होती. यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह क्लास आणि ७ चेअर कारचा समावेश होता. नियमित सेवा सुरू झाल्यापासून ही ट्रेन सातत्याने १०० टक्क्यांहून अधिक समर्थनासह धावत आहे. या मार्गावरील प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या वंदे भारत ट्रेनची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने सध्याच्या ट्रेनच्या कोचमध्ये आठ अतिरिक्त कोच वाढवण्याचा निर्णय घेतला. नवीन रचनेत १,०२४ प्रवाशांची क्षमता असलेल्या १४ चेअर कार आणि १०४ प्रवाशांची क्षमता असलेले दोन एक्झिक्युटिव्ह क्लास कोच असतील. म्हणजे एकूण १,१२८ प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकणार आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संदीप माथूर यांनी सांगिले की, या वंदे भारत ट्रेनचे डबे दुप्पट झाल्यामुळे आता अधिक रेल्वे प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत. आयटी शहरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांदरम्यान वंदे भारत ट्रेन धावणार असल्यामुळे याचा आणखी फायदा याठिकाणच्या प्रवाशांना होणार आहे. या ट्रेनद्वारे ते जलद आणि आरामदायी प्रवास करू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT