Gold- Silver Price Today  Saam TV
देश विदेश

Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं

साम टिव्ही ब्युरो

Gold Price Today : तुम्ही जर सोने-चांदी (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. अशातच सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. कारण, आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. (Gold Price Today In India)

सोने-चांदी आजचा भाव काय?

सोमवारी सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रतिकिलो ५९० रुपयांनी वाढले. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रतितोळा ५१,००० इतके झाले आहेत. चांदीचे (Silver) दर प्रतिकिलो ५३,००० वर पोहचलेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. MCX वर आज सोन्याचे दरात ११३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचे दर ५० हजार ४८१ इतके झाले. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीचे दर प्रतिकिलो २८२ रुपयांनी वाढून ५३ हजार ३०४ वर पोहचले आहेत. (Gold-Silver Price Today)

देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर (Gold Silver Rate Today)

दिल्ली : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८८०, चांदीचे दर ५३,२२०

मुंबई : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८८०, चांदीचे दर ५३,२२०

कोलकाता : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८९०, चांदीचे दर ५३,२२०

चेन्नई : २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,५१०, चांदीचे दर ५८,२००

हैदराबाद : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८९०, चांदीचे दर ५८,२००

बंगलुरु : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८९०, चांदीचे दर ५८,२००

अहमदाबाद : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,९४०, चांदीचे दर ५३,२२०

सूरत : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,९४०, चांदीचे दर ५३,२२०

नागपुर : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,९२०, चांदीचे दर ५३,२२०

पुणे : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,९२०, चांदीचे दर ५३,२२०

भुवनेश्वर : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,८९०, चांदीचे दर ५८,२००

चंडीगढ़ : २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,०५०, चांदीचे दर ५३,२२०

जयपुर : २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,०५०, चांदीचे दर ५३,२२०

लखनऊ : २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,०५०, चांदीचे दर ५३,२२०

पटना : २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,९२०, चांदीचे दर ५३,२२०

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT