Amit Shah vs Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला धोका दिला. २०१४ साली २ जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली होती. आता एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे आणि ती आपल्या सोबत आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, असा हल्लाबोलही शाह यांनी केला. (Amit Shah News Today)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले अमित शाह?
शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याला धोका दिला. राजकारणात सगळं सहन करा मात्र धोका नाही. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष २०१४ मध्ये केवळ २ जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. (Amit Shah vs Uddhav Thackeray News)
खरी शिवसेना शिंदे गटाचीच : अमित शाह
भाजपने शिवसेनेला कधी छोटा-मोठा भाऊ म्हटलं नाही, उद्धव ठाकरे यांनीच भाजपसोबतची युती तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता महाराष्ट्रात भाजपचं बहुमतात सरकार आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे आणि ती आपल्या सोबत आहे, आपल्याला मुंबई महापालिका जिंकायचीच आहे. मी मुंबई महापालिकेसाठी १५० जागांचं टार्गेट ठेवलं आहे. भरपूर मेहनत करा आणि यश मिळवून द्या', असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना तसंच कार्यकर्त्यांना सांगितलं.
उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली : अमित शाह
पुढे बोलताना शाह म्हणाले की, 'राजकारणात जो धोका देतो तो कधीच यशस्वी होत नाही. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला, मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे', असंही अमित शाह म्हणाले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.