Amit Shah : उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली; अमित शाहांचा घणाघात

एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ती आपल्या सोबत आहे, असंही अमित शाह म्हणाले.
Amit Shah vs Uddhav Thackeray
Amit Shah vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत, साम टिव्ही

Amit Shah vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला धोका दिला. २०१४ साली २ जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ती आपल्या सोबत आहे, असंही अमित शाह (Amit Shah) म्हणाले. सागर बंगल्यावरील बैठकीत ते बोलत होते. (Amit Shah Todays News)

Amit Shah vs Uddhav Thackeray
Sanjay Raut ED Custody: संजय राऊतांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यानंतर शाह यांनी सहकुटुंब 'लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, सून आणि नातवंडही असल्याचं पाहायला मिळालं. शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. त्यानंतर पुष्पहारही अर्पण केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.

लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात अमित शाहांनी शिवसेनेवर निशाणा साधला. (Amit Shah vs Uddhav Thackeray Latest News)

'उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. २०१४ साली २ जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली. राजकारणात जो धोका देतो तो कधीच यशस्वी होत नाही. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. आता एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. आणि ती आपल्या सोबत आहे', असंही अमित शाह म्हणाले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मुंबई महापालिका आपल्याला जिंकायचीच आहे. मी मुंबई महापालिकेसाठी १५० जागांचं टार्गेट ठेवलं आहे. भरपूर मेहनत करा आणि यश मिळवून द्या, असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना तसंच कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com