Gold Silver Price Today
Gold Silver Price Today  Saam TV
देश विदेश

Gold Silver Price : खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; जाणून घ्या आजचे दर

Satish Daud-Patil

Gold Silver Price Today : स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याची वाट बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात मौल्यवाण धातूंच्या किंमती खाली आल्याने सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली. (Latest Marathi News)

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

सोमवारी सराफा बाजार उघताच, सोन्याच्या (Gold) किंमतीत वाढ झाली होती. मात्र, दुपारनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात आज २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रतितोळा ४० रुपयांनी घसरला आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ५६ हजार ८४० इतका आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

सोन्याबरोबर चांदीच्या (Silver) दरातही आज घसरण झाली आहे. सराफा बाजारात १ किलो चांदीचे दर ८० रुपयांनी घसरले आहेत. बाजार खुलताच, चांदीचा भाव प्रतिकिलो १६० रुपयांनी वाढला होता. मात्र, दुपारनंतर त्यात मोठी घसरण झाली. सध्या सराफा बाजारात १ किलो चांदीचा भाव ६८ हजार ९८० इतका आहे.

जागतिक बाजारातही सोने-चांदी दरात घसरण

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) दरात घसरण दिसून आली. सोन्याचा भाव घसरणीसह $1,926 प्रति औंस झाला. चांदीचा भाव 23.88 डॉलर प्रति औंस राहिला. तज्ञांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखीच घसरण होण्याची शक्यता आहे.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT