Gold Rate : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर Saam Tv
देश विदेश

Gold Rate : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय किमती घसरल्मुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर खाली आले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोने प्रति १० ग्रॅम १९९ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दारात देखील घसरण नोंदवण्यात आली आहे. १ किलो चांदीची किंमत २५० रुपयांपर्यंत खाली आली आहे.

हे देखील पहा-

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचे मोठे विधान केले आहे. यानंतर असे मानले जाते की, सध्या अमेरिकेमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता नाही. म्हणून दरावरती दबाव आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव आणखी कमी होणार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज ९९.९ टक्के सोन्याचा दर १९९ रुपयांनी घसरून ४६,३८९ रुपयांवर आला आहे.

या अगोदर शुक्रवारी दिवसभरात व्यवहारानंतर ते ४६,५८८ वर बंद करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात $ १,८१४ प्रति औंस झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर २५० रुपयांनी घसरून, ६२,०६३ रुपये प्रति किलो झाली आहे. याअगोदर मागील ट्रेडिंग सत्रात चांदीची दर ६२,३१३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत ही दर २३.९९ डॉलर प्रति औंस होती.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

SCROLL FOR NEXT