Gold Silver Price Today 1 March 2023
Gold Silver Price Today 1 March 2023 Saam TV
देश विदेश

Gold Price Today : लग्नसराईत गोड बातमी! सोन्याच्या दरात ३५०० रुपयांची घसरण; महिनाभरात कशी राहिली वाटचाल?

Satish Daud-Patil

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी तेजी आली होती. २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची भाव जवळपास ६० हजारांपर्यंत गेला होता. मात्र, महिनाभरात त्यात मोठी घट झाली आहे.

गेल्या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या (Gold And Silver Price)  दराने उच्चांक गाठला होता. ऐन लग्नसराईत सोन्याने मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. २ फेब्रुवारीला सोन्याचे दर ५९ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहचले होते. पण आता महिनाभरापासून सोने उतरणीला लागले आहे.

बुधवारी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा (Gold Price) भाव प्रतितोळा ५६ हजार २९० रुपयांवर आले आहेत. म्हणजेच काय तर गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात जवळपास ३ हजार ५०० हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे.

दुसरीकडे सोन्याबरोबर चांदीच्या (Silver Price) दरातही मोठी घसरण झाली आहे. २ फेब्रुवारीला भारतीय सराफा बाजारात १ किलो चांदीचा भाव ७२ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. मात्र, आज १ मार्च रोजी चांदीचा भाव ६६ हजार ८०० रुपये इतका आहे. म्हणजे काय तर महिनाभरात १ चांदीचा भाव जवळपास ५ हजार ५०० रुपयांनी कमी झाला आहे.

अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण होईल, असा अंदाज सोने व्यावसायिक आणि ग्राहकांना होता. मात्र, अर्थसंकल्पानंतर २ फेब्रुवारीला एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह ६१ हजार इतक्या विक्रमी पातळीवर आणि चांदीचे दर ७४,७०० रुपयांवर गेले होते. परंतु, २ फेब्रुवारीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होऊ लागली. (Latest Marathi News)

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १ हजार ८०८ डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीही घसरून २०.४७ डॉलर प्रति औंस झाली. येत्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असं झाल्यास भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढतील.

घरबसल्या असे तपासा सोने-चांदी दर

सोन्या-चांदीचे दर आता तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईवरून ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एक संदेश प्राप्त होईल. ज्यामध्ये तुम्ही नवीन दर तपासू शकता. जर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल, तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Onion Export: 'साम' च्या बातमीचा इम्पॅक्ट; आता गुजरातसोबत महाराष्ट्रातल्या कांद्याचीही निर्यात

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT