Diwali 2024 Saam tv
देश विदेश

Edible gold silver sweets : बाजारात आली सोने-चांदीची मिठाई; किंमत जाणून अवाक व्हाल

gold mithai rate : बाजारात सोने-चांदीची मिठाई आली आहे. अनेक जण ही मिठाई लोकांना भेट देत आहेत. या मिठाईची किंमत जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : तुम्ही अनेकदा व्यक्तीच्या अंगावर सोने-चांदीचे दागिने पाहिले असतील. त्याचबरोबर तुम्ही खरेदी देखील केले असतील. आता या दिवाळीत थेट सोने-चांदीची मिठाई बाजारात विक्रीसाठी आली आहे. या मिठाईची किंमत ३० हजार ते ४५ हजार रुपये किलो आहे. सोने आणि चांदी एकत्रित करून मिठाई तयार केली जाते.

सोने-चांदीची मिठाई राजस्थानच्या जयपूरमध्ये तयार केली जाते. या मिठाईचे दर बाजारातील सोने-चांदीच्या भावानुसार बदलत असतात. या मिठाईतील एक पीस अंगठी ठेवण्याचा बॉक्समध्ये ठेवला जातो. याशिवाय या मिठाईसोबत आर्टिफिशियल ज्वेलरी मोफत दिली जाते. या सोने-चांदीची मिठाई खूप स्वादिष्ट असल्याचं दुकानदार सांगतात.

अनेक जण सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी अनेकदा विचार करत असतात. मात्र, जयपूरमधील लोक ही मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या सोन्याच्या मिठाईतील एका पीसची किंमत १५५० रुपये इतकी आहे. तर चांदीच्या मिठाईतील एका पीसची किंमत ७५० रुपये इतकी आहे. सोने-चांदीची मिठाई महाग असूनही लोकांची मोठी मागणी आहे.

gold mithai

दिवाळीचं औचित्य साधून लोक सोने-चांदीची मिठाई भेट देत आहेत. सोने-चांदीची मिठाई जितकी महागडी आहे. त्याचबरोबर त्याचा बॉक्स देखील महागडा आहे. या मिठाई सोने-चांदी दागिन्यांच्या बॉक्समध्ये दिली जाते. या मिठाई सिंगल पीस देखील अंगठीच्या बॉक्समध्ये दिला जातो.

या दुकानाच्या मालक अंजली जैन म्हणाल्या की, '१ किलो सोन्याच्या भस्म पाकातील मिठाईत ४० पीस येतात. या सोन्याच्या मिठाईची किंमत ४५००० रुपये इतकी आहे. तर एक किलो चांदीच्या भस्म पाकातील मिठाईची किंमत ३० हजार रुपये इतकी आहे. या मिठाईची रेसिपी अनेक महिने संशोधन केल्यानंतर तयार करण्यात आली आहे. या सोने-चांदीची मिठाई आरोग्यासाठी चांगली आहे. या मिठाईसाठी लागणारा कच्चा माल हा कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि अफगाणिस्तान येथून मागवला जातो.

मिठाई कशी तयार केली जाते?

दुकानाचे सहसंस्थापक कुणाल जैन म्हणाले, आम्ही बदामाला गरम पाण्यातून उकळून घेतो. त्यानंतर त्यात देशी घी मिश्रित करतो. त्यानंतर थंड करून मिठाईसाठी ठराविक प्रमाणात साखरेचा पाक मिश्रित करतो. यासाठी पाण्यात भिजवलेला केसर मिश्रण दोन वेगवेगळ्या भांड्यात घेतो.

एक मिश्रण हे सोन्याच्या मिठाई तर दुसरी चांदीच्या मिठाईसाठी असते. एक किलो मिठाईमध्ये १.२५ ते १.५ ग्रॅम सोन्याने तयार करण्यात आलेली राख मिश्रित करतो. त्याची किंमत ३०००० रुपयांहून अधिक आहे. तर चांदीच्या राखेचा पाक आणि सोन्याच्या राखेच्या पाकावर सोन्याचा वर्ख लावून मिठाई तयारी केली जाते. मिठाई तयार करण्याचा प्रक्रिया ही हलवा करण्यासारखी आहे. दोन्ही मिठाईत पाकाचा समावेश केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Parenting Tips: तुम्ही मुलांना सतत ओरडता? मुलं तुमचेच ऐकतील, 'या' टीप्स करा फॉलो

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस हे आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Pravin Tayade News : वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं; बच्चू कडुंचा पराभव करणाऱ्या तायडेंनी व्यक्त केल्या भावना

Ram Shinde: कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो..., राम शिंदेंचे थेट अजित पवारांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT