Diwali 2024
Diwali 2024 Saam TV

Diwali 2024 : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत? वाचा सविस्तर

Lakshmi Pujan : आज आम्ही तुम्हाला खास दिवाळीच्या सणामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे सांगणार आहोत.
Published on

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रकाशाचा असतो. दिवाळीच्या सणामध्ये सर्वत्र लाडू, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे यासारख्या विविध गोडधोड पदार्थांचा खमंग वास दरवळत असतो. आपल्या शेजारी तसेच नातेवाईक एकमेकांना घरी फराळासाठी बोलवतात. लहान मुले ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले बनवतात. चारही बाजूंनी नुसता कल्ला आणि धावपळ पाहायला मिळते. त्याचबरोबर शास्त्रानुसार दिवाळीच्या सणामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो. आपल्या सगळ्यांवर लक्ष्मीची कृपा कायम राहावी यासाठी आपण काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला खास दिवाळीच्या सणामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे सांगणार आहोत.

आपल्या घरामध्ये लक्ष्मी पाऊल ठेवते अशावेळी आपण तिच्या स्वागतासाठी घराची काही खास तयारी केली पाहिजे. सर्वातआधी जाणून घेऊया लक्ष्मीच्या येण्याने घरात सुख शांती नांदावी यासाठी काय काय करावे.

Diwali 2024
Diwali Wishes 2023 : शुभ दीपावली! लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा

1) घर स्वच्छ ठेवणे :

तुम्ही तुमच्या आजीच्या किंवा आईच्या तोंडून ही म्हण बऱ्याचदा ऐकली असेल ती म्हणजे 'हात फिरे तिथे लक्ष्मी वसे'. ही म्हण म्हणावी तितकी खरी आहे. तुम्ही तुमचं घर सणसूदिनच्या दिवसांमध्ये स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे. तुम्ही घरातील तर प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून लक्ष्मी अगदी हसत खेळत तुमच्या घरी नांदेल.

2) लक्ष्मीपूजन :

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची उपासना केली पाहिजे. यासाठी देवीची मूर्ती स्वच्छ धुवून त्याचबरोबर तिच्या अंगावर नवीन वस्त्रे चढवून तिची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर लक्ष्मीचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे तो पुरणपोळी. तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला पुरणपोळी आणि आमटी भाताचा भोग चढवला पाहिजे.

3) संध्याकाळच्या वेळी घरात उजेड ठेवणे :

सायंकाळी 7:00 ही वेळ लक्ष्मीची असते. त्यामुळे तुमच्या घरातील बंद दिवे आणि अंधार पाहून लक्ष्मी घरात प्रवेशच करणार नाही. यासाठी सायंकाळी 6:00 वाजल्यापासूनच घरात रोशणाई त्याचबरोबर दिवा, पंत्या आणि तुळशी समोर तुपाचा दिवा लावण्या अत्यंत गरजेचे आहे. तरच तुमच्या घरी लक्ष्मी सुख घेऊन येईल.

4) धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करा :

धनत्रयोदशीच्या दिवशी देखील देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. लक्ष्मी म्हणजेच पैसे त्यादिवशी बऱ्याच व्यक्ती पैशांची पूजा देखील करतात. एवढेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी धन, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी सोनं देखील खरेदी करतात. तुम्हाला सोनं खरेदी करायचं नसेल तर तुम्ही घरामध्ये एखादी नवीन वस्तू देखील आणू शकता. दिवाळीच्या काळात या गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

कोणत्या गोष्टी करू नये हेही जाणून घ्या :

1) अन्नाचा अपमान करू नका :

केवळ सणासुदीच्या काळातच नाही तर, कधीच अन्नाचा अपमान करू नये. बऱ्याच व्यक्तींना सवय असते भरमसाठ जेवण बनवायचं आणि कोणी खाल्लं नाही की फेकून द्यायचं. परंतु असं करून तुम्ही देवी अन्नपूर्णेचा अपमान करत आहात. जो व्यक्ती अन्नाचा अपमान करतो त्याला भविष्यात मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

2) राग आणि भांडणे टाळा :

सण उत्सवाच्या काळात कुटुंबातील व्यक्तीने एकमेकांशी भांडण करू नये. त्याचबरोबर एकमेकांवर राग देखील धरू नये. तुमच्या अशा वागण्यामुळे लक्ष्मीची कृपा राहणे कठीण होऊन बसेल. त्याचबरोबर घरामध्ये सण-उत्सव असल्यासारखं वाटणार नाही.

3) कडू आणि तिखट अन्न बनवू नका :

दिवाळीचा सण म्हणजेच अगदी गुलाबजामच्या पाकासारखा मधुर सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या घरात गोडा-धोडाचे पदार्थ असतात. त्यामुळे तुम्ही कडू आणि तिखट अन्न शिजवू नका आणि सेवनही करू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Diwali 2024
Lakshmi Pujan 2023 : दिवाळीच्या दिवशी चुकूनही देवी लक्ष्मीला अर्पण करु नका ही फुले, खिशात पैसाच राहणार नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com