Goa government ₹3000 LPG cylinder scheme 2026 saam tv
देश विदेश

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! वर्षाला 3 सिलिंडरसाठी मिळणार 3,000, अर्ज कसा कराल?

LPG Subsidy Scheme Application Process September 2026: सरकार पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन LPG सिलिंडरसाठी ₹3,000 ची आर्थिक मदत देणार आहे. 5 सप्टेंबरपासून अर्ज उपलब्ध होणार असून पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Omkar Sonawane

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गोवा सरकार राज्यातील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन LPG सिलेंडर खरेदी करण्यासाठी 3,000 ची आर्थिक मदत देणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे पात्र कुटुंबांना वर्षातील तीन LPG सिलेंडरच्या खर्चासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांना अर्ज करावा लागणार आहे. 5 सप्टेंबरपासून पंचायत आणि आमदारांच्या कार्यालयांमध्ये अर्जाचे फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 9 सप्टेंबरपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3,000 जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

गोवा सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार गोव्यातील पात्र रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागतील:

आधार कार्ड

बँक पासबुक

मतदार ओळखपत्र

पात्रता पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून LPG सिलेंडर मोफत घरपोच दिले जाणार नाहीत, तर सिलेंडर खरेदीसाठी 3,000 ची थेट आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

भाजप सरकारने 2022च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दरवर्षी तीन मोफत LPG सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाची अंमलबजावणी आर्थिक मदतीच्या स्वरूपात केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांसोबत ठेका

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन; कट रचणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sunday Horoscope : 'या' 4 राशींना मिळणार आर्थिक लाभ; तुमची रास कोणती? वाचा रविवारचे राशीभविष्य

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात 'हे' फळं, डॉक्टरांनी सांगितले ७ फायदे

Toilet Cleaning : कमोडवरचे पिवळे डाग जाईना? या ट्रिक्सनं बाथरुम होईल चकचकीत

SCROLL FOR NEXT