LPG ग्राहकांसाठी अलर्ट ! या तारखेपर्यंत eKYC केली नाही तर गॅस बुकिंग होणार नाही, सबसिडीही रोखणार

lpg ekyc deadline august 16 : एलपीजी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. १६ ऑगस्टपर्यंत ई केवायसी केली नाही तर, सिलिंडर बुकिंग होणार नाही. तसेच सबसिडीही रोखली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
16 ऑगस्टपर्यंत eKYC केली नाही तर गॅस बुकिंग, सबसिडी मिळणार नाही
eKYC केली नाही तर गॅस बुकिंग, सबसिडी मिळणार नाहीsaam tv
Published On

स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरातली अत्यावश्यक बाब झाली आहे. तुम्ही एलपीजी (LPG) कनेक्शन वापरत असाल, तर तुमच्यासाठी eKYC संदर्भातील ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने गॅस ग्राहकांच्या नोंदी अपडेट करण्यासाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

याबाबत देशभरात मोहीम राबवली जात आहे. १६ ऑगस्टपर्यंत eKYC केले नाही, तर कोणत्याही ग्राहकांना गॅस बुकिंग, सबसिडीसह इतर सेवांसाठी विविध अडचणी येऊ शकतात. गॅसशी संबंधित सेवांचा लाभ योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचत राहावा, हा यामागचा उद्देश आहे.

eKYC सर्व एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे, परंतु काही ग्राहकांनी ते प्राधान्याने पूर्ण केले पाहिजे. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांनी ते कधीही अपडेट केलेले नाही किंवा ज्यांनी अलीकडेच आपला मोबाइल नंबर, घराचा पत्ता किंवा इतर वैयक्तिक माहिती बदलली आहे. अशा परिस्थितीत गॅस एजन्सीकडून eKYC साठी एसएमएस (SMS) किंवा कॉल आला असेल, तर अशा ग्राहकांनी विलंब न करता ते पूर्ण करावे.

ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही eKYC पूर्ण केले नाही, तर एजन्सीच्या सर्व्हरवर तुमची नवीन नोंद अपडेट मानली जाणार नाही. यामुळे सिलिंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात. याशिवाय खात्यात जमा होणारी अनुदानाची (सबसिडी) रक्कमही रोखली जाऊ शकते.

एजन्सीमध्ये जाऊन eKYC करण्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि गॅस कनेक्शनचे पासबुक सोबत घेऊन जा. त्यानंतर तिथले कर्मचारी तुमच्या आधार क्रमांकावरून आवश्यक माहिती पडताळून पाहतील. यानंतर बायोमेट्रिकद्वारे eKYC पूर्ण केले जाईल आणि तुमची माहिती अपडेट होईल.

जर तुम्हाला एजन्सीमध्ये जायचे नसेल, तर तुम्ही हे घरी बसूनही करू शकता. यासाठी इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅससारख्या गॅस कंपनीची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाइल ॲप उघडा. तुमच्या अकाउंटवरून लॉग इन केल्यानंतर eKYC किंवा KYC Update सेक्शनवर जा. येथे एलपीजी ग्राहक नंबर, नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि आधार नंबर टाका. त्यानंतर ओटीपी (OTP) पडताळणी करा आणि eKYC प्रक्रिया पूर्ण करा.

16 ऑगस्टपर्यंत eKYC केली नाही तर गॅस बुकिंग, सबसिडी मिळणार नाही
LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

eKYC करण्यासाठी आधार कार्ड, गॅस कनेक्शनचे पासबुक किंवा एलपीजी ग्राहक नंबर आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर जवळ ठेवा. गॅस एजन्सीने मागणी केल्यास इतर कोणतेही ओळखपत्र किंवा पत्त्याचा पुरावा द्यावा लागू शकतो. जर तुमचा सध्याचा मोबाइल नंबर आधारशी लिंक नसेल, तर आधी तो अपडेट करून घ्या, जेणेकरून ओटीपी (OTP) मिळण्यात अडचण येणार नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती शेअर करू नका.

16 ऑगस्टपर्यंत eKYC केली नाही तर गॅस बुकिंग, सबसिडी मिळणार नाही
LPG Gas KYC Update : १० दिवसात e-KYC करा, अन्यथा सिलिंडर दुपट्टी दराने करावा लागेल खरेदी, वाचा नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com