utpal parrikar Saam Tv
देश विदेश

Goa Election Result 2022: गोव्यात भाजपमध्ये बंडखोरी केलेले उत्पल पर्रीकर पिछाडीवर

मतमोजणीच्या सुरुवातीला पर्रीकर आघाडीवर होते.

साम वृत्तसंथा

Goa Election Result 2022: गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप विरोधात बंडखोरी केलेले उत्पल पर्रीकर पणजी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. उत्पल पर्रीकर हे भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parikar) यांचे पुत्र आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीला पर्रीकर आघाडीवर होते. पुन्हा ते पिछाडीवर आले आहेत.

गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांपैकी 37 जागांचे कल येऊ लागले आहेत. भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 16 जागांवर पुढे आहे. इतर उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत. वास्कोमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर. कराचोरममधून काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर 178 मतांनी आघाडीवर आहेत. तर मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पारसेकर आघाडीवर आहेत.

गोव्यात जागा वाटपाच्या सुरुवातीलाच पणजीत जागेसाठी गोंधळ सुरु होता. उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी दिली नाहीतर ते बंडखोरीच्या तयारीत होते. पणजी मतदार संघ हा दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा होता. भाजपने (BJP) पणजीतून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली. त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना देण्यात आली.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT