Ghaziabad Fire Update Canva
देश विदेश

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Ghaziabad Fire: गाझियाबादमधील असलेल्या कुलिंग बनवणाऱ्या कारखान्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. लागलेल्या आगीचा स्फोट इतका जोरात होता की, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गाझियाबादमधील असलेल्या कुलिंग बनवणाऱ्या कारखान्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. लागलेल्या आगीचा स्फोट इतका जोरात होता की, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोट होताच तात्काळ अग्निशमन(fire fighting) दलाचे पथक घटना स्थळी दाखल झाले असून बंबाच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते. तथापी जवळपासच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

गाझियाबादमध्ये पर्यावरण माहिती मंडळ पहारपूर कूलिंग टॉवर्स लिमिटेड या औद्योगिक विभाग ४ मध्ये एक कुलिंग टॉवर(Tower) कारखाना आहे. या कारखान्याला रविवार ५ मे रात्री ९.३०च्या आसपास आग लागली होती. या कारखान्यात केमिकलने भरलेले असंख्य ड्रम ठेवण्यात आले होते.अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली मात्र नेमके आगीचे कारण समजू शकलेले नाही.

जिवीतहानी टळली

कुलिंग बनवणारा कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर करण्यात येतो. या कारखान्यात साधारण ७०० हून अधिक कामगार काम करतात. रविवारी तेथील एका प्लांटमध्ये काम सुरु होते पंरतु रविवार सुट्टीचा दिवस बहुतेक कामगार सुट्टीवर होते. आग लागलेली समजताच सर्व कर्मचारी बाहेर आले.त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे

आग विझविण्याचे प्रयत्न सुरु

रविवारी कारखान्याला आग लागताच कारखान्यात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने पहिल्यांदा अग्निशमन दलाला माहिती देऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अधिक वेगात पसरली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते.कारखान्याचे साइट इन्चार्जचे आगीचे कारण समजू शकलेले नाही असे सांगितले मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT