Fire News: भीषण अग्नितांडव; राज्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना, नाशिकमध्ये स्फोटात तिघे होरपळले

Fire Incident At Vasai Buldhana Nashik: राज्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघेजण होरपळल्याची माहिती मिळत आहे.
Fire Incident
Fire IncidentYandex

महेंद्र वानखेडे, साम टिव्ही विरार

आज सकाळी विरारमध्ये एका दुकानाला भीषण आग (Fire Incident) लागली. विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या दुकानात आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. स्टेशन परिसर दुकान असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ होती. आग लागल्याचं दिसल्यानंतर या परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडालेली पाहायला (Fire News) मिळाली. शेजारीच एटीएम आणि मोबाईलचे दुकान असल्याने ही आग आजूबाजूला पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.

घटनेची माहिती वसई विरार पालिकेच्या अग्निशमन जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. वसई विरारमध्ये गेल्या दोन दिवसात दोन आगीच्या घटना घडल्या (Fire Incident AT Vasai) आहेत. शहरात आज अनेक दुकाने , हॉटेल्सला अग्निविरोधी यंत्रणा न बसवल्याने आगीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

नाशिकच्या सिडको परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली (Nashik News) आहे. सिलेंडर स्फोटाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटात तीन जण जखमी तर एक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सिडकोच्या चौपाटी येथील सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सिडकोच्या चौपाटी परिसरातील खाद्यपदार्थांची (Fire Incident At Nashik) दुकानांच्या लेनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्याचा प्रयत्न करणारा अग्निशामक दलाचा एक जवान देखील स्फोटात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पोलीस या आगीच्या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

Fire Incident
Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर येथे एका टिन पत्र्याच्या घराला आग लागली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळाले आहे. घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली (Fire Incident At Buldhana) नसली तरी घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे. उषा बोराळे आपल्या दोन्ही मुलासह शेतात कामाला गेल्या असता तिकडे अचानक शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली.

या आगीने संपूर्ण घराला आपल्या विळख्यात घेतलं होतं. स्फोटाच्या जोरदार आवाजामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं (Buldhana Breaking) होतं. तात्काळ लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती बुलढाणा अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल बिरसिंगपूर येथे दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविले. यात उषा बोराडे यांचे जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Fire Incident
Bihar Fire News : दुर्दैवी! लग्नघरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं सिलिंडरचा स्फोट; कुटुंबातील ६ जण होरपळले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com