Mukesh Ambani-Gautam Adani Saam Digital
देश विदेश

Gautam Adani Billionaire List: जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी 'आऊट', अंबानी कुठल्या स्थानी?

अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्वाधिक २० टक्क्यांपर्यंतची पडझड झाल्याचे बघायला मिळाले.

साम टिव्ही ब्युरो

Top 10 Billionaires List Gautam Adani - Mukesh Ambani : जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतील नावांमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. बऱ्याच काळापासून या यादीत समावेश असलेले भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे दोघेही या यादीतून बाहेर झाले आहेत.

अलीकडेच अदानी ग्रुपसंबंधी (Adani Group) अमेरिकी रिसर्च कंपनी हिंडनबर्गचा रिपोर्ट (hindenburg research) प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील कंपन्यांचे शेअर दणकून आपटले होते. परिणामी आठवडाभरातच गौतम अदानी हे जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाले.

अदानींची संपत्ती किती?

हिंडनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. हा अहवाल प्रसिद्ध झाला त्याला आठवडा उलटला आहे. त्याचा मोठा फटका अदानी ग्रुपला बसला आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत घट होऊन ती आता ८४.४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत अकराव्या स्थानी आहेत.

अदानींच्या कंपन्यांचा MCap घसरला

बिझनेस टुडेनुसार, हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर बाजाराच्या सूचीतील सात कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये केवळ तीन दिवसांत ५.५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्वाधिक २० टक्क्यांपर्यंतची पडझड झाल्याचे बघायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Kidney Trafficking : चंद्रपूर किडनी प्रकरणात दुसर्‍या आरोपीला अटक; चीन कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT