Haryana: धक्कादायक! सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन

Tragedy at Haryana Secretariat: हरियाणा सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका आयएएस अधिकाऱ्याचे विशेष सचिवाने आत्महत्या केली आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Tragedy at Haryana Secretariat
Senior official Ganesh Das Arora, who served under IAS officer Hitesh Kumar Meena, dies in tragic incident at Haryana Secretariat.saam tv
Published On
Summary
  • हरियाणा सचिवालयात सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन अधिकाऱ्याची आत्महत्या.

  • मृत अधिकारी गणेश दास अरोरा हे आयएएस अधिकाऱ्यांचे विशेष सचिव होते.

  • घटनेनंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ.

हरियाणा सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. मृत व्यक्ती हे एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याचे विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे सचिवालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गणेश दास अरोरा (वय ५८) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आयएएस अधिकारी हितेश कुमार मीणा यांचे विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Tragedy at Haryana Secretariat
Crime News : दिराची वहिनीवर वाकडी नजर; मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार

हाती आलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सचिवालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. तेव्हा अरोरा यांनी अचानक सहाव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. सहाव्या मजल्यावरून कोणीतरी खाली पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यांना तातडीने सेक्टर-१६ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

गणेश दास अरोरा यांनी आत्महत्येचं पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरोरा हे येत्या नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना त्यांनी जीवन संपवलं होतं. याबाबत पोलीस त्यांचे सहकारी आणि कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे.

Tragedy at Haryana Secretariat
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

घटनास्थळाचा पंचनामा केला असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि जवळपास उपस्थित असलेल्या इतरांचे जबाब नोंदवले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com