देश विदेश

आधीच इंधन तुटवडा त्यात दरवाढीचा भडका; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार? VIDEO

petrol diesel price hike : केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केली आहे. गेल्या 10 दिवसांत इंधन दरात साडे सात रुपयांची वाढ झालीये. त्यातच पेट्रोल- डिझेल मिळवण्यासाठी नागरिक कसे हैराण झालेत? डिझेलच्या तुटवड्यानं शेतकऱ्यांचा कसा संताप झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केली असून गेल्या 10 दिवसांत इंधन दरात 7.50 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे महाराष्ट्रात एकीकडे पेट्रोल दरवाढीनं नागरिक हैराण झालाय तर दुसरीकडे, डिझेल तुटवड्यानं शेतकरी हवालदिल झालाय. या दरवाढीमुळे राज्यातील विविध ठिकाणी नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. नांदेडमधील सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीची झळ बसलीये. त्यामुळे नागरिक चांगलेच हवालदिल झालेत.. तर शिर्डीत इंधन तुटवड्यामुळे व्यवसाय संकटात सापडले आहेत.

वाशिममध्ये पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. चढ्या दराने डिझेल मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणींचा फेरा वाढलाय.

नागपूरात पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झालाय. दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशावर ताण पडत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

राज्यात इंधन तुटवडा आणि त्यात होणारी दरवाढ यामुळे नवं संकट निर्माण झालंय. इतकंच नव्हे तर आता इंधन पुरवठा आणि दरवाढ स्थिर ठेवण्यासाठी योग्य पद्धतीनं नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच, जनतेला विश्वासात घेऊन यावर उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा इंधन तुटवड्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

SCROLL FOR NEXT